गुरुविन ज्ञान नाही
पाटी नको माझी कोरी
ज्ञानरूपी जीवनाची
गुरु देईल शिदोरी ॥१ ॥
आशा उज्ज्वल भविष्य
हित जाणी गुरुवर्य
चिमुकल्या पाखरांचे
हाती ते महान कार्य ॥ २ ॥
ज्ञानदान असे श्रेष्ठ
भेट गुरू शिष्या आस
दिशा सकल जीवना
कार्यपूर्ती मनी ध्यास ॥३ ॥
थोर महंत विभूती
गुरु महिमा अपार
नीतीमुल्ये शिकवण
सांगे जीवनाचं सार ॥४ ॥
माता पिता गुरुजन
ऋण अखंड स्मरावे
होई जन्माचे सार्थक
जगी सत्कार्य करावे ॥५ ॥
*सुवर्णा घोरपडे (कवियत्री)*
संग्रामनगर-अकलूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा