Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १४ जुलै, २०२४

सराटी येथे तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने प्रशासनाचा यथोचित सन्मान संपन्न

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

--- जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची देहु आळंदी ते सराटी दरम्यान शासनाच्या सर्व यंत्रणेने चौक बंदोबस्त व योग्य नियोजन ठेवल्याबद्दल सोहळा प्रमुखांच्या वतीने सराटी येथे येथोचीत सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील अकलूजकडे मार्गस्थ झाला.

      जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील शेवटच्या सराटी मुक्कामी पोहोचला. दि. २८ जून ते ११ जुलै दरम्यान शासनाच्या महसूल, पोलीस, आरोग्य व ग्रामविकास विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी चोवीस तास नियोजनबद्ध बंदोबस्त करून पालखी सोहळ्यातील वारकरी, भक्तांना सर्व सुख सुविधा पुरवल्या आहेत. कोणत्याही प्रकारची उणीव भासून दिली नाही. स्वतःच्या खाण्यापिण्याची व राहण्याची पर्वा न करता सोहळ्यातील वारकरी भक्तासाठी सर्व सोय पुरवण्यात अधिकारी कर्मचारी मग्न होते.



     अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सुदर्शन राठोड, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अभय तिडके, तालुका आरोग्य अधिकारी सुरेखा पोळ, बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ अभिषेक ताटे, डॉ धनश्री हासे, सुरेश सोनवलकर, मंडलाधिकारी मल्लाप्पा ढाणे, सरपंच अनिशा तांबोळी, उपसरपंच संतोष कोकाटे, विस्तार अधिकारी युनूस शेख, ग्रामसेवक अर्जुन साळुंखे, गणेश लंबाते, सरपंच प्रतिनिधी समीर तांबोळी आदिंचा सन्मान करण्यात आला.

     संत तुकाराम महाराज देहु संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम मोरे महाराज, विश्वस्त भानुदास मोरे, अजित मोरे, संजय मोरे, अभिजित मोरे, माणिक मोरे, नितीन मोरे, बापूसाहेब मोरे महाराज, प्रल्हाद मोरे, बाळासाहेब मोरे, रामदास मोरे, अशोक मोरे यांच्या वतीने फेटा, शाल, श्रीफळ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. 

फोटो - सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांच्या वतीने प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

----------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा