Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

*महागाईचा दर लक्षात घेता सोयाबीनचा दर 6000 रुपये प्रति क्विंटल निश्चित करावा... खा.ओमराजे निंबाळकर यांची मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी*


 

टाइम्स 45 न्युज मराठी

 मो;--9730 867 448

सोयाबीन पिका करीता किमान 6 हजार रुपये प्रती किंवटल दर निश्चीती करुनृ शासकीय खरेदी

 केंद्र सुरु करावे अशी मागणी धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे

             याबाबत सविस्तर वृत्त असे की

 महाराष्ट्र राज्यातील शेतकरी उत्पन्नाचा मुख्य स्ञोत म्हणून सोयाबीन पिकाचे लागवड मोठ्या प्रमाणात करतात. दरवर्षी वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सोयाबीन पिकाचे उत्पन्न व त्यावर होणान्या खर्चात मोठी तफावत निर्माण होत आहे. यामुळे शेतकयांचे उत्पन्न कमी होत आहे. तसेच 2013-14 या वर्षामध्ये सोयाबीनचे शासकीय खरेदी दर 4600 रुपये प्रती क्विंटल होता. परंतु 10 वर्षानंतर 2023-24 मध्ये यात पट करण्यात आली असून खरेदी दर 4100 रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे. याउलट सोयाबीन पिकाचे उपन्न घेण्याकरीता लागणाऱ्या मुलभुत वस्तुवरील महागाई 250 टक्केपेक्षा जास्तीची नोंदवली गेली आहे.

वर्ष 20024-25 मध्ये राज्य शासनाने सोयाबीनचे किमान खरेदी मुल्य 4892 रुपये एवढे निश्चीत केले आहे. चालू वर्षाचा महागाई दर लक्षात घेता शेतक-यांच्या हाती सोयाबीन पिकातून नगन्य रक्कम शिल्लक राहतआहे

त्यामुळे सोयाबीन पिका करीता किमान खरेदीमुल्य 6 हजार रुपये प्रती क्विंटल दर निश्चीती करुन शासकीय खरेदी केंद्र सुरु करणेबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ते सहकार्य करावे.  अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे




(ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा