*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448
जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ तालुका तुळजापूर या शाळेचे जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये विक्रमी यश प्राप्त केले असुन जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ येथील विद्यार्थ्यांनी 17 वर्षाखालील विविध वजनी गटांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले. प्रियंका विजय साळुंखे हिने 49 किलो वजनी गटात प्रथम वसुधा रामेश्वर हजारे हिने 59 किलो वजनी प्रथम तर मुलांमध्ये अथर्व ज्ञानेश्वर पाटील याने 67 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवलेला असून श्रेयस संजय कोरेकर याने 61 किलो वजनी गटात द्वितीयक्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक आलेल्या तीन विद्यार्थ्यांची निवड नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी झालेली आहे. त्यांच्या यशाबद्दल धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व स्पर्धकांना प्रशालेचे मुख्याध्यापक शिवाजी राठोड सर, तनपुरे सर , राऊत सर, वाघमोडे सर, आशिष साठे सर,फुगारे सर, सरडे मॅडम,वाघचौरे मॅडम,दरेकर मॅडम तसेच पोतदार मावशी व कापसे मामा यांचे मार्गदर्शन लाभले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा