उपसंपादक --- नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळशिरस तालुक्यातील गणेशगांव येथे आज सदाशिव जगन्नाथ शेंडगे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली.यापूर्वी पोपट रुपनवर यांनी एक वर्षाचा सरपंच पदाचा कार्यकाल उत्तम रित्या पार पाडला.
सरपंचपदाची निवड होताच ग्रामस्थ व मान्यवर यांनी गणेशगांवचे दैवत श्री गणेश मंदिर येथे जाऊन स्वयंभू गणेशाचा आशीर्वाद घेतला त्यांनतर वाजत गाजत त्यांची घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी ग्रामसेवक लता घुले,विठ्ठल नलावडे,माजी सरपंच शोभा नलावडे,रहीना नजीर शेख, उषा रामचंद्र ठोंबरे,डेप्युटी सरपंच बाळू ठोकळे, गीताई विकास सोसायटी गणेशगांव, संस्थापक सीताराम महादेव शेंडगे, चेअरमन गीताई सोसायटी हनुमंत सोलनकर,गुलाब शेख, बाळासाहेब शेडगे , आबासाहेब बाबर,नशीर शेख, संभाजी शेंडगे,रामचंद्र मोरे,मंगल मदने आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.नूतन सरपंच सदाशिव शेंडगे यांनी गावाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली.उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा