Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४

*प्राॕपर्टी व इस्टेट साठी नातेसंंबंध तोडणाऱ्यांनो सावधान ....मृत्यूचा देवदूत (फरिश्ता) आपली वाट पाहत आहे*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

 *सांगली*

   *मो;--8983 587 160

इस्टेट साठी नातेसंबंध तोडणाऱ्यांनो सावधान ! मृत्यूचा देवदूत (फरिश्ता ) आपली वाट पाहत आहे. गोरगरिबांचं आणि इतरांच्या हक्काचं पचवलं किंवा संगनमत करून इस्टेट "हडपली" तर ईश्वरी कोप होणारच ! 

गरिबांचे लुबाडून श्रीमंत आणखी श्रीमंत होत आहेत, फसवणूक- धोका - धमकी - गैरफायदा - आणि मानसिक त्रासाद्वारे एखाद्याला दुःख देणे म्हणजे साक्षात परमेश्वराला "ललकारणे" असा त्याचा अर्थ होतो. कारण हृदयापासून - आतडीपासून ज्यांचा "तळतळाट" आणि श्राप लागतो तो "खराचं" ठरतो. अशा या "नीच प्रवृत्तीमुळेचं" करोडपती असलेले ,भिकारी झाल्याचे असंख्य उदाहरणे आज आढळतात. 



या व्हिडिओ मध्ये आपण पाहाल की ,मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतर संपत्तीच्या "हव्यासापोटी" "कब्रस्थान" मध्ये ,कबर मध्ये वडिलांचे शेवटचे दर्शन घेतो म्हणून कबरीमध्ये उतरतो. "कपटी" आणि स्वार्थी वृत्तीमुळे इस्टेटीच्या कागदावर तो वडिलांच्या हाताचे ठसे घेणार असतो तोपर्यंत मृत्यूचा देवदूत( फरिश्ता ) तात्काळ या मुलाचे प्राण घेतो. काही कळते न कळते तोच त्या मुलाचा "मृत्यू" होतो.

पैशाची - संपत्तीची "हाव" कुटुंब आणि "स्वतःचे अस्तित्व" नष्ट करत असते. आणि हें कळेपर्यंत "वेळ" निघून गेलेली असते. 

गोरगरीब व गरजवंतांचे "अधिकार" आणि हक्क याची पायमल्ली केल्यास अशाप्रकारे देव "शिक्षा" देत असतो. इतरांचा हक्क माराल तर तुम्ही केलेले पुण्य नगण्य ठरते. 

प्रामाणिक रहा,गोरगरिबांवर दया करा, आर्थिक मदत करा, कुणावरही अन्याय करू नका, परमेश्वराची भक्ती करा. आज पुढच्यास ठेच ..मागील शहाणा ..हाच धडा आज यानिमित्ताने आपणास मिळाला.



*इकबाल बाबासाहेब मुल्ला* 

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध 

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा