*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव या गावास कायमस्वरूपी लाईनमन देण्यात यावे यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले
काक्रंबा ता. तुळजापूर या गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कायम स्वरूपी लाईनमन नाही, जे लाईनमन आहेत ते कंत्राटी बेसवर काम करत आहे.
परंतु गेल्या तीन महिन्यांपासून त्यांना महावितरण कार्यालयाकडून पेमेंट न मिळाल्यामुळे त्यांनी गेल्या तीन महिन्यापासून काम बंद केले आहे. वरील कारणामुळे गावामध्ये वेळी-अवेळो लाईट जाणे व लाईट परत येण्याचो निश्चित वेळ नसल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे. तसेच शेतामधील कामे ही मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. गेल्या ८ दिवसापासुन पाऊस नसल्यामुळे पिकांना पाणी देण्याची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु लाईटच्या अनिश्चितीमुळे पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. तसेच गावामध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा लाईन देखील विजे अभावी बंद राहत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनेक डिपोंचे दरवाजे मोडलेले असुन त्यांची अवस्था दर्यानय आहे. अशा उघड्या डिपीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी काक्रंबा ता. तुळजापूर कायमस्वरूपी लाईनमनची व्यवस्था करून गावातील विजेचा प्रश्न लवकरात लवकर मागों लाऊन, नादुरूस्त डिपो बदलण्या बाबत विज महामंडळाच्या संबंधीत अधिकाऱ्यांसह खासदार ओमराजे निंबाळकर यांना लेखी निवेदन दिले
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सद्दाम मुलानी युवासेना शाखाप्रमुख दिपक भिसे आदींनी स्वाक्षरी केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा