Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

*माळशिरस येथील "पत्रकार-- शोभाताई वाघमोडे "यांनी बंदीजणांना राख्या बांधून अवगुण सोडून देण्याचे केले आवाहन*


 

*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्युज मराठी*

दिनांक १९/८/२०२४ रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या पवित्र दिवसाचे औचित्य साधून पत्रकार शोभा वाघमोडे यांनी ६० बंदी जणांना राख्या बांधून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली व अवगुण सोडून देण्याचे केले आवाहन. यावेळी अनेक बंदी जणांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तराळले. अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी बहिणीने आपल्या भावांना अवगुण सोडून देण्याचे आवाहन केले.


तसेच अनेक शासकीय अधिकारी आपल्या कर्तव्यामुळे आपल्या बहिणीकडे जाता येत नसल्याने अधिकारी,कर्मचारी,माजी सैनिक, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक व सर्व पोलीस स्टाफ या सर्वांना तसेच  माळशिरस  तहसीलदार यांच्या परवानगी जेलर यांच्या समक्ष राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा