Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

*ग्रामीण भागातील समस्या चित्रपटातून मांडल्या गेल्या पाहिजे ---अनिलकुमार गायकवाड* *के रवीदादा यांच्या "रक्षणबंधन"लघुचिञपटाचा शुभारंभ*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

मुंबई, ग्रामीण भागातील समस्या या सध्याच्या प्रभावी ठरणाऱ्या सोशल मीडिया वरून प्रसारित होऊन त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे उद्गगार मुंबई महाराष्ट्र राज्य  रस्ते विकास महामंडळ  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी येथे बोलताना काढले. माहीम येथे रक्षणबंधन लघुपटाचे उद्घघाटन गायकवाड यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फिल्म क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 



       आदिवासी ग्रामीण भागातील विविध प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत. ही बाब अत्यंत चिंतेची आहे त्याची सोडवणूक सरकार बरोबरच समाजसेवी संस्थांनी केली पाहिजे, त्यासाठी माझ्या नावाने ही एक सामाजिक संस्था महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबवत आहे. शिक्षण आरोग्य पर्यावरण अशा पाच सूत्री कार्यक्रमावर या संस्थेचा भर आहे. पर्यावरण म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यातील दहा गावांमध्ये वृक्ष वाटप करून त्यांचे संगोपन करणाऱ्या कुटुंबाला सन्मानित करून विशेषतः महिलांना साडीचोळी दिली जाईल, असा आपण सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. भविष्यात राजकारणात जायचे की नाही?हे अद्याप ठरलेले नाही, पण चित्रपट क्षेत्रात एखादी भूमिका करण्यास आवडेल, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. यावेळी रक्षणबंधन चित्रपटाचे निर्माता व ज्येष्ठ समाजसेवक के रवी दादा यांनी यावेळी रक्षणबंधन लघुपटतून सामाजिक संदेश कसा दिला जाईल, याबाबत सविस्तर माहिती दिली. या चित्रपटातून सामाजिक संदेश दिला जाणार आहेच, परंतु सामाजिक संघटनानी आदिवासी पाड्यातील गोरगरिबांना त्यांच्या विकासासाठी   सीएसआर फंडाचा  योग्य वापर करावा, तसेच भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांनी आदिवासी विकासासाठी ठोस योजना राबवली पाहिजे, अशी अपेक्षा निर्माता समाजसेवक के रवी दादा यांनी बोलताना व्यक्त केली. यावेळी श्री कडतोबा मुव्हीजचे निर्माता दिग्दर्शक के रवी दादा , बालकलाकार मनस्वी गायकवाड , रोशनी दुपारगुडे, राजश्री शेंडे, शरद रणपिसे, महादू पवार, राजेश वाळुंज, नईम शेख,  माजी  पोलीस अधिकारी समाजसेवक अरविंद पटकुरे, डीआरआयचे माजी संचालक नारायण जाधव, डॉ्.रतन पवार, दीपक पडये, रमजान सिद्दिकी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा