*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
साहित्यभूषण पुरस्काराने इंद्रजीत पाटील सन्मानित
वार्ताहर - लाेककला,कलावंत,साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य,वडाळा महादेव,ता.श्रीरामपूर,जि.अहमदनगर या संस्थेच्या वतीने साहित्यिक इंद्रजीत पाटील यांना साहित्यभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंतीचे आैचित्य साधून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.शाल,श्रीफळ,फेटा,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप हाेते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.बाबूराव उपाधे,उदघाटक मा.किशोर निर्मळ,प्रमुख अतिथी मा.नितीन दिनकर,स्वागताध्यक्ष मा.सुनिल साबळे प्रमुख पाहुणे डाॅ.अंबादास सगट,चित्रपट गीतकार मा.बाबासाहेब साैदागर, मा.सायमन बारस्कर,मा.लहानुभाऊ खरात व इतर नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.या संस्थेचे सर्वेसर्वा मा.बाबासाहेब पवार यांनी बहारदार कवी संमेलनाचे व विविध क्षेत्रातील गुणीजनांचा गाैरव करण्याचे कार्य अगदी तत्परतेने पार पडले.सदर कार्यक्रम रंगतदार झाला.
इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीचा आलेख वरचे वर वाढत चालला आहे.त्यामुळे त्यांचे श्री. पंडितराव लोहोकरे,चंद्रकांत पाटील,संजय भड,अमाेल देशमुख, राकेश गरड यांनी अभिनंदन केले व पुढील साहि
त्यिक वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा