Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

*शंकरराव मोहिते महाविद्यालयात अष्टयात्तर व स्वतंत्र दिन उत्साहाने साजरा*


 

*अकलुज--प्रतिनिधी*

 *केदार   लोहकरे*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयामध्ये भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्राचार्य डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य टिळेकर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना स्वतंत्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

      प्रमुख पाहुणे डॉ.टिळेकर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या हुतात्मा भगतसिंग,सुखदेव, राजगुरू यांनी हुताम्य पत्कारले. तसेच स्वातंत्र्य संग्रामात लोकमान्य टिळक,महात्मा गांधी,सुभाषचंद्र बोस,राणी लक्ष्मीबाई,लालबहादूर शास्त्री यांचे सर्वाधिक योगदान असल्याचे सांगितले.



          या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक सत्यजीत चव्हाण याला महाराष्ट्र शासनाचा सन २०२२-२३ सालचा राज्यस्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने फेटा, शाल,पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.तसेच माळशिरस येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेली विद्यार्थींनी कु.प्रेरणा विकास गायकवाड हिचा सत्कार करण्यात आला.

            स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी महात्मा फुले शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री धुमाळ,बी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल भानवसे,डी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.नानासाहेब देवडकर व शंकरराव मोहिते महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयाचे प्रबंधक राजेंद्र बामणे व युवराज मालुसरे, विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक सूर्यवंशी सर यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार प्रा. अरविंद वाघमोडे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा