*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
अकलूज आणि परिसरात घरफोडी चेन स्कॅनिंग फसवणूक करणाऱ्या विविध गुन्ह्यातील सर्वात गुन्हेगारांना अकलूज पोलिसांनी अटक करून त्यांच्या कडील 1,78000/रु .मुद्देमाल जप्त करुन त्यामध्ये 22 ग्रॕम वजनाचे सोन्याचे दागिणे व 80,000 रु रोख रक्कम हस्तगत केला
गुन्हयाची थोडक्यात हकिकत:
अकलूज पोलीस ठाणे परिसरात घरफोडी, चोरी, फसवणुक या प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे मा. वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देवून वेळोवेळी गुन्हे प्रकटीकरण पथकास गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करुन घरफोडी, चोरी, फसवणुक चे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकास घरफोडी, चोरी, फसवणुकी वे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक १६/०८/२०२४ रोजी पथकातील ए. एस.आय. श्रीकांत निकम, पोहेकों / १०९८ विक्रम घाटगे, पोहेकों / १५८९ शिवकुमार मदभावी, पोकों/१२९६ सोमनाथ माने यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती अशी कि,
१) दिनांक १०/०७/२०२४ रोजी दुपारी १.०० वा. चे सुमारास फिर्यादी संध्यादेवी रावसाहेब चोरमले या भाजीमंडई व किराणामाल घेण्याकरीता सदुभाऊ चौकातून जात असताना इसम नामे अभिमान बापू तुपे वय ५० वर्षे रा. पिटी ता. पाटोदा, जि. बीड, विकास विजय जाधव वय २७ वर्षे रा. धसपिंपळगांव ता. पाटोदा, जि. बीड यांनी त्यांचेजवळ येवून म्हणाले की, तुमच्या समोर रस्त्यावर पांढ-या कापडात काहीतरी बांधून पडले आहे तो दुसरा इसम घेवून गेला आहे. त्यानंतर तिसरा इसम जवळ आला व म्हणाला, येथे पडलेले पांढ-या कपडयातील सोने कोण घेवून गेला आहे का? त्यावर फिर्यादीने, मला माहिती नाही असे म्हणाले. त्यानंतर पहिल्या इसमाने, तुम्ही माझे आई सारखे आहात, चला त्या इसमाला शोधू, तो इसम मिळून आल्यावर आपण त्याच्याकडे मिळालेले सोने आपण दोघेजण वाटून घेवू, त्यानंतर महावीर स्तंभाजवळ तलाठी कार्यालयाकडे जाणारे रोडवर त्याने फिर्यादीस, तुमच्याजवळील सोने दया, त्या बदल्यात मी तुम्हाला सोन्याची बिस्कीटे देतो असे म्हणून त्याने फिर्यादीचे अंगावरील दागिने काढून घेतले व त्या बदल्यात लोखंडी बिस्कटाच्या आकाराची पटटी त्यावर सोनेरी रंगाचे अवरण असलेली देवून अर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे व दागिन्यांपैकी १ सोन्याचे मणीमंगळसुत्र दिले आहे.
२) दिनांक १२/०७/२०२४ रोजी सकाळी ०९.०० वा. चे सुमारास सदाशिवराव माने विदयालय अकलूज येथील श्री. संत तुकाराम महाराज पालखी रिंगण सोहळ्याचे वेळी फिर्यादी बाळासाहेब सदाशिव बागाव वय ४० वर्षे रा. वडोली ता. माढा जि. सोलापूर हे दर्शनाकरीता आले असताना त्यांचे गळ्यातील दीड तोळे वजनाची चैन चोरीला गेली होती. आरोपी नामे दिपक मच्छिंद्र जाधव वय ३० वर्षे रा. शास्त्रीनगर, नावंडीनाका, पेठ बीड, जि. बीड याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून सदरची चैन हस्तगत करण्यात आली आहे.
३) दिनांक ०८/०८/२०२४ रोजी रात्री ०१.०० ते पहाटे ०५.०० वा चे दरम्यान फिर्यादी समीर आजाद मणियार वय २५ वर्षे रा. ब्लडबँकेजवळ, अकलूज ता. माळशिरस याचे घराचे किचनचा पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी दरवाजाचा कोयंडा उचकटून घरामध्ये प्रवेश करुन बेडरुममधील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले होते. सदर गुन्हयाचे अनुषंगाने तपास करुन बातमीदाराकडून शुभम परशुराम भोसले वय १८ वर्षे, रोहित उर्फ गोटया सचिन भोसले वय १८ वर्षे रा. महर्षी कॉलनी, अकलूज ता. माळशिरस व दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी केला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा शोध घेवून ते मिळून आल्याने त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली
दिल्याने त्यांना अटक करुन गुन्हयातील गेले मालांपैकी ८०,०००/- रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हयांचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, सोलापूर
ग्रामीण, नारायण शिरगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलून विभाग, अकलूज, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक योगेश लंगुटे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा महाडीक, पोलीस अंमलदार ,पो.हे.काँ/978 अमोल बकाल पो.हे.काँ /1098 विक्रम घाडगे,पो.हे.काँ /1589 शिवकुमार मादभावी पो.हे.काँ/1586 स्वरुप शिंदे,पो.हे.काँ/ 1765 सुभाष गोरे,पो.हे.काँ/1296 सोमनाथ माने पो.का़ /1882 प्रविण हिंगणगावकर, अकलूज पोलीस ठाणे हे करीत आहेत.
फिर्यादी संध्यादेवी रावसाहेब चोरमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध. गुन्हा रजिस्टर नंबर 362/2024 बी एन एस 2023 कलम 328(4) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादी बाळासाहेब सदाशिव बागाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 363 / 2024 बी एन एस 2023 कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे
फिर्यादी समीर आझाद मणियार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 400/2024 बी एन एस 2023 कलम 331( 4) 300(5) अ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा