Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

*सर्वोच्च न्यायालयाच्या, एस सी/ एस टी आरक्षणामध्ये* *क्रिमीलेयर लागू करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ" अकलूज बंद" यशस्वी*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

एससी/एसटी आरक्षणामध्ये क्रिमी लेयर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आरक्षण बचाव संघर्ष समितीने 21 ऑगस्टला भारत बंदची घोषणा केली  त्या अनुषंगाने  अकलुज ता.माळशिरस जि.सोलापूर येथे या बंद ला व्यापारी नागरिक व्यवसायिकांनी उस्फूर्तपणे पाठिंबा दिल्याने बंद यशस्वी झाला त्याला 



अनेक दलित संघटनांनीही भारत बंद ला  पाठिंबा दिला. याशिवाय बसपनेही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यास सांगण्यात आले होते





भारत बंद का?


सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना एससी/एसटी आरक्षणामध्ये क्रिमी लेयर तयार करण्याची परवानगी दिली आहे. ज्यांना खरोखर गरज आहे त्यांना आरक्षणात प्राधान्य मिळायला हवे, असे न्यायालयाने म्हटले आहे. भारत बंदची घोषणा करणाऱ्या संघटनांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे


भारत बंद दरम्यान रुग्णालये आणि रुग्णवाहिका यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू होत्या बँक कार्यालये व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणताही आदेश आलेला नाही. त्यामुळे बुधवारी बँका आणि सरकारी कार्यालयेही चालू होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा