Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १० मे, २०२६

*माध्यमिक शालांत परीक्षेत लक्ष्मीबाई कन्या प्रशालेचे घवघवीत यश ...*

 *अकलूज प्रतिनिधी*

 *शकूरभाई तांबोळी*

    *टाइम्स 45 न्यूज मराठी*


शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलूज संचलित लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर च्या विद्यार्थिनींनी माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .प्रशालेतून एकूण ३२ विद्यार्थिनी विशेष श्रेणीमध्ये पास झाल्या. प्रशालेचा निकाल९४.१७%इतका लागला. कु.श्रेया काळे ९२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु.प्रगती मासाळ व कु. आयेशा सय्यद या विद्यार्थिनींनी९०.८०टक्के गुण मिळवून द्वितीय , तसेच कु.कावेरी साठे हिने९०.६०टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक प्राप्त केला .

यशस्वी सर्व विद्यार्थिनींचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक संचालक  जयसिंह मोहिते -पाटील,संस्थेचे अध्यक्ष -संग्रामसिंह मोहिते -पाटील ,संस्थेच्या संचालिका तथा प्रशालेच्या सभापती .कु.स्वरूपाराणी मोहिते -पाटील,संस्थेचे सचिव अभिजीत रणवरे ,सहसचिव .हर्षवर्धन खराडे ,प्रशाला समिती सदस्य व मुख्याध्यापिका अनिता पवार यांनी केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा