*गुलाम होतो तेव्हा आम्ही हिंदुस्थानी होतो सारे!*
*मिळताच स्वातंत्र्य आम्हा*
*आम्ही हिंदू मुस्लिम झालो रे!!*
*करो या मरो चे लावले होते*
*मिळून साऱ्यांनी नारे!*
*भासते वारंवार आता*
*शहीदांचे स्वप्न राहिले अधुरे!!*
*तिरंग्यातील तीन रंग आहेत*
*सर्वांना एकत्र बांधणारे!*
*दिसतायत आता सर्वच धार्मिक रंग ओढणारे!!*
*रक्ताचे पाट वाहिले देशासाठी*
*विसर आता सर्वांना पडलारे!*
*ऐकतेचा भाव आता अनेक रंगात बुडला रे!!*
*शाहिदांच्या स्वप्नातील भारत*
*आता गद्दारांनी फाडला रे!*
*ज्यांच्या हाती देश सोपवीला*
*त्यांनीच बंधुभाव गाडला रे!!*
*आयते फळ चाखायला मिळाले म्हणून विसरले सारे!*
*शाहिदांचे ते देशाला एकत्र बांधणारे एकात्मतेचे नारे !!*
*तिरंगा सांगतो सदा*
*एकात्मतेला जपा रे!*
*धर्मभेद विसरा ,जगाला*
*अनेकतेतून ऐकता दाखवा रे!!*
*नूरजहाँ शेख*
*गणेशगांव*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा