*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
केरळमध्ये आत्ताच झालेल्या नैसर्गिक आपत्तीत जेव्हा सर्वत्र हाहाकार उडाला होता, तेव्हा एका 40 वर्षीय नर्सने आपल्या धैर्याने आणि कौशल्याने सर्वाला चकित करून सोडलं. या नर्सचं नाव आहे सबीना. सबीना यांनी कर्तव्याच्या भावनेने प्रेरित होऊन एका नदीवरून झिप लाईन क्रॉस करत जवळपास 35 लोकांचे प्राण वाचवले.
तामिळनाडूमधील एका एनजीओ नर्स म्हणून काम करणाऱ्या एका चाळीस वर्षे महिलेने थोड्या दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या वायनाड मधील 35 जणांचे प्राण वाचवले आहे नदीवरचा फुल पडला असला तरी खचून न जाता मोठ्या धाडसाने झिप लाईन ने नदी क्रॉस करून तिथे ते पोहोचली आणि 35 जणांचे प्राण वाचवले
केरळ मधील वायनाड गावात प्रचंड पावसामुळे पूर आला होता आणि अनेक लोक आपल्या घरांमध्ये अडकले होते. या परिस्थितीत सबिना यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवले. कोणतेही पूर्व प्रशिक्षण नसतांना केवळ मानवतेच्या दृष्टीने त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे साहस केले आहे. आपल्या अनुभवाचा वापर करून या कठीण परिस्थितीत शांत राहून सर्व लोकांना धीर दिला.
सबिना यांच्या धैर्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. परंतू प्रसारमाध्यमं हे जास्त हायलाईट करत नाही हे सुद्धा दिसून येतंय. सबिना यांच्या या कृत्याने आपल्या सर्वांना मानवता आणि परोपकाराचे महत्व समजावून दिलं आहे. आपल्या समाजात अशा अनेक वीर नायिका आहेत ज्यांचा आपण योग्य तो सन्मान करणं गरजेचं आहे. अश्या लोकांमुळेच आपला समाज अधिक सक्षम आणि मजबूत बनतो.
सबिना यांच्या या अविस्मरणीय कार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांनी दाखवलेले धैर्य आणि कौशल्य हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे
दंगे भडकाविण्यात पटाईत असणाऱ्या आणि मदतीचा फेक फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्यांना एक चपराकच आहे
तिच्या या कार्याबद्दल केरळ सरकारने त्यांना "कल्पना चावला या शौर्य पुरस्काराने "सन्मानित केले आहे
*तिच्या या कार्याला सॅल्यूट, सलाम*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा