इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष संदिप मोहिते यांनी केली.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त परिसरातील गावोगावी अभिवादन करण्यात आले. टणू येथील कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सरपंच प्रतिनिधी समीर मोहिते, माजी सरपंच राजाभाऊ मोहीते, ग्रामपंचायत सदस्य तेजस मोहिते, जेष्ठ नागरिक सुधाकर मोहिते, प्रकाश (काका) मोहिते, विकास मोहिते, दत्तात्रय मोहिते, संभाजी मोहीते, अभिमान जगताप, बापुराव जगताप, राजेंद्र जगताप, विलास मोहीते, सुदाम जगताप, सोमनाथ देवकर, जितेंद्र जगताप, अमोल जगताप, सागर मोहिते, रोहन मोहिते, लहु जाधव, सतीश जगताप आदी उपस्थित होते.
संदिप मोहिते पुढे म्हणाले, तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी साताऱ्यातील वाळवा तालुक्यात झाला. एक थोर मराठी समाजसुधारक, लोककवी व लेखक होते. त्यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह व १४ लोखनाट्यासंग्रह लिहिले आहेत.
नीरा नरसिंहपूर परीसरातील पिंपरी बुद्रुक, गिरवी, नरसिंहपूर, गणेशवाडी, गोंदी, टणू आदि गावात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात माजी सरपंच श्रीकांत बोडके, पांडुरंग बोडके, नामदेव बोडके, सुदर्शन बोडके, ग्रामसेवक गणेश लंबाते, संतोष सुतार, सोमनाथ बोडके, लक्ष्मण गायकवाड, जगूमामा मोहिते, भाऊ रणदिवे, शंकर रणदिवे आदि मान्यवर उपस्थित होते.
फोटो - टणू येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
---------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा