*अकलूज ----प्रतिनिधी*
*केदार लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागामार्फत रानभाज्या, मिलेट्स आणि पल्सेस यावर प्रदर्शन आयोजित करण्यात आले.पावसाळ्याच्या दिवसात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या रानभाज्यांचे खूप महत्त्व आहे. इतर भाज्याप्रमाणे या भाज्या गुणकारी आहेत.त्यांच्या मध्ये भरपूर प्रमाणात लोह,एंटी ऑक्सीडेंट,फायबर असतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्या करिता यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे.या रानमेव्याचे महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे,त्यांची ओळख आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.सविता सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पती शास्त्र विभागाने हे प्रदर्शन आयोजित केले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रा.डॉ.शिवप्रसाद टिळेकर यांनी फित कापून केले.याप्रसंगी बोलताना त्यांनी पालेभाज्यांचे महत्त्व सांगत ह्या भाज्या न खाल्ल्यामुळे होणारे दुष्परिणाम सविस्तर सांगितले. तसेच हार्ट अटॅक,डायबिटीस हे होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे.याचेमुळ कारण जंक फूड असून या जंग फूडमुळेच अनेक आजार अकाली होत असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच
विद्यार्थ्यांनी घरचे अन्न जास्तीत जास्त खा पण जंक फूडच्या नादी लागू नका असा सल्ला दिला.या प्रदर्शनामध्ये बी.एस्सी भाग एक, दोन,तीन च्या विद्यार्थ्यांनी ३८ प्रकारच्या रानभाज्या,पल्सेस, मिलेट्स यांच्या पाककृतीचेही प्रदर्शन केले.या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी तांदूळजा,चिघळ, पाथरट,कामुनी,ल्युकस, काठेमाठ,आंबटचुका,शेपू,शेवगा, अंबाडी,चाकवत,राजगिरा इत्यादी विविध भाज्या तसेच विविध डाळी आणि मिलेट्स प्रदर्शन केले.
या प्रदर्शनास महाविद्यालयातील ज्युनियर, सीनियर विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग,रजिस्ट्रार बामणे सर तसेच सर्व विद्यार्थी वर्ग यांनी भेट दिली.हा कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी प्रा.दिपराज माने-देशमुख,प्रा.सी.डी.चव्हाण,
व्ही.एम.कुंभार,बी.बी. कदम आणि बी.एस्सी भाग-३ चे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा