Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

*सदाशिवराव माने विद्यालयात सुरेल जयघोषात "समूह गीत गायन "स्पर्धा संपन्न*


 

*अकलुज-----प्रतिनिधी*

 *शकुर    तांबोळी*

 *टाइम्स 45 न्युज मराठी*

आॕगस्ट क्रांती दिन व स्वातंत्र्य दिन स्मरणार्थ सदाशिवराव माने विद्यालयात समुहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

          इयत्ता सहावी ,  इयत्ता दहावी ,  इयत्ता अकरावी व बारावी, इयत्ता नववी,  इयत्ता आठवी , इयत्ता सातवी,  इयत्ता पाचवी अशा सात गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी बलसागर भारत होवो ,  जहा डाल डाल पर ,  ए मेरे वतन के लोगो ,  मेरा कर्मा तू , ए वतन ए वतन , जय जय महाराष्ट्र माझा,  सारे जहाँ से अच्छा  अशी एकापेक्षा एक रोमहर्षक देशभक्तीपर समुहगीते सादर केली आणि संपूर्ण वातावरणात राष्ट्रभावना जागविली. विद्यार्थ्यांनी ड्रेपरीपासून, संगीत, वादन, गायन आदि सर्वच बाबतीत अत्यंत बारकाईने तयारी करून उत्कृष्ट सादरीकरण केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक,  उपमुख्याध्यापक,  सर्व पर्यवेक्षक, शिक्षक प्रतिनिधी, शिक्षकेतर प्रतिनिधी उपस्थित होते.



             या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुहास पवार सर यांनी केले. आभार प्रदर्शन विष्णू राजगुरू सर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा