Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

*कराड तालुक्यात मुलीवर अत्याचाराची घटना..... संपूर्ण कराड तालुका हादरला!..*


 

टाइम्स 45 न्युज मराठी

 मो;--9730 867 448

कराड :-- देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच कराड तालुक्यातही असा प्रकार उघडकीस आला आहे. कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कराड तालुका पोलिसात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी एकास अटक केली आहे.


विनोद विलास काटकर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन वर्षापासून एक अल्पवयीन मुलगा व विनोद काटकर यांनी वेळोवेळी अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर झाली. विनोद काटकर याने तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला. 


याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनोद काटकर व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी विनोद काटकर यास आज मंगळवारी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस फौजदार भिलारी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा