Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४

*सामाजिक कार्यकर्ते" अमोल (भैया )जाधव यांच्या आंदोलनाला यश शेतकऱ्यांचे ऊस बिल खात्यावर जमा----शेतकरी वर्गानी मानले "अमोल जाधल यांचे आभार*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते, अमोल भैया जाधव, यांनी तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाकरिता आणि कर्मचाऱ्यांच्या पगारी करता कारखाना प्रशासनाच्या विरोधात वारंवार निवेदन देऊन आंदोलने करून शेवटी त्यांनी तुळजापूर येथे भीक मागो आंदोलन केले होते त्या आंदोलनास यश आले असून तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्यांनी तुळजापूर तालुक्यातील तब्बल दहा हजार, शेतकरी बांधवाचे थकीत ऊस बील खात्यात जमा केले त्यामुळे

समस्त शेतकरी कष्टकरी यांचे पैसे वसूल करून दिल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने , आमोल भैय्या जाधव यांचे आभार व्यक्त करण्यात आले

  तसेच कारखाना प्रशासनाने अमोल जाधव यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे बील आदा केल्यामुळे अमोल जाधव यांनी कारखाना प्रशासनाचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा