*उपसंपादक -- नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
बहीण भावाच्या अतूट नात्याची, प्रेमाची जपणूक करणारा सण म्हणजे रक्षाबंधन.आज देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो.बहिण भावाचा हा सण लवंग २५/४ येथील फिनिक्स स्कूलच्या चिमुकल्यानी मोठ्या उत्साहात साजरा केला.
मुलींनी स्वतः आपल्या हाताने फुले,लोकर,रेशमी धागे, कापूस,रंगीत तांदूळ,मनी अशा गृहपयोगी वस्तूंचा वापर करून शाळेतील भावांसाठी अतिशय सुंदर मनमोहक अशा राख्या बनवून आपल्या भावाचे तोंड गोड करीत मनगटावर राख्या बांधल्या तर भावांनीही आपल्या बहिणींसाठी चॉकलेट्स,पेन्सिल, पेन,बांगड्या,टिकली पॉकेट देऊन भावाचे कर्तव्य बजावण्याची परंपरा जोपासली.
या उपक्रमामुळे मुलींच्या सुप्त गुणांना वाव मिळाला. कार्यानुभव अंतर्गत मुलींच्या कलेला संधी मिळाली मुलींनी स्वतः राख्या बनविल्यामुळे मुलींच्या चेह-यावर वेगळाच आनंद दिसत होता हा उपक्रम राबविण्यासाठी फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका,अध्यक्षा नूरजहाँ शेख,गुलशन शेख ,तमन्ना शेख यनी परिश्रम घेतले व पालक संघाचे उपाध्यक्ष महादेव कोळेकर यांनी विदयार्थ्यांना पेढे वाटून या रक्षाबंधनाचा गोडवा वाढवीला .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा