*मुख्यसंपादक --हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9730 867 448
माळशिरस तालुक्यातील रेशन दुकानदारांना E-pos मशीन बंद असले कारणाने तसेच दुकानदारांच्या अडचणींची दखल घेण्यात यावी. या मागणीसाठी माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकानदाराच्यावतीने उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून यावर तोडगा काढू असे आश्वासन देण्यात आले या निवेदनाद्वारे रेशन दुकानधारकांनी केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे
१मशीन बंद असले कारणाने धान्य वाटपास उशीर होत आहे या कारणाने कार्ड धारक आणि
धान्य दुकानदार यांत गैरसमज व वाद होत आहेत म्हणून याचे निःसरण होणे गरजेचे आहे.
सर्वर चालू होऊन धान्य वाटप पूर्ववत कसे होतील याची कारणमीमांसा करणे गरजेचे आहे. ३. २०२२ "नोव्हेंबर" आणि "डिसेंबर" या महिन्यातील रोख पद्धतीने भरलेले चलनाचे पैसेवारंवार पत्र व्यवहार करूनही आज पर्यंत दुकानदारास मिळाले नाहीत. ४. प्रलंबित प्राधिकार पत्र लवकरात लवकर नुतनीकरण करून मिळावे.
५.काही दुकानदारांचे नियमित धान्य वाटपाचे कमिशन "२वर्षे" पत्र व्यवहार करूनही आज पर्यंत मिळाले नाही याचा सहानभूतीपूर्वक विचार व्हावा.
६.E-pos सर्व्हर च्या अडचणी १४ ऑगस्ट पर्यंत निकालात नाही निघाल्या तर १५ ऑगस्ट रोजी दुकानदार संघटने कडून सर्व E-pos मशीन तहसील कार्यालय येथे जमा करण्यात
येतील.
७.ऑफलाईन वाटपामध्ये पारदर्शकता दिसत नसल्यामुळे आम्हास फक्त ऑनलाईन वाटपाचीच गरज आहे या बद्दल आम्हा दुकानदारांच्या मनात कोणतेही दुमत नाही.
याप्रसंगी माळशिरस तालुका स्वस्त धान्य दुकान दार संघटनेचे मार्गदर्शक शिरीष पाडे जिल्हा संघटक वैभव फळे तालुकाध्यक्ष दयानंद शेळके कार्याध्यक्ष साजिद भाई सय्यद जिल्हा सचिव प्रकाश गायकवाड तालुका उपाध्यक्ष निलेश धोत्रे सत्यवान वळकुंदे विश्वास सिद तालुका सचिव राजेंद्र जाधव ज्येष्ठ Browsing कुलकर्णी काका बोराटे अण्णा गणेश वसेकर पराग गायकवाड आणि तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा