Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

*मंगरूळ ता. तुळजापूर येथे 12 ऑगस्ट ला अशोक जगदाळे यांच्या संकल्पनेतून "खेळ रंगला पैठणीचा" कार्यक्रमाचे आयोजन*

 


*तुळजापूर तालुका,प्रतिनिधी*

 *चाँदसाहेब शेख*

  *टाइम्स 45 न्युज मराठी

अशोक भाऊ जगदाळे यांच्या संकल्पनेतुन खास श्रावण महिन्याचे औचित्य साधून खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सोमवार १२ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे आयोजन करण्यात आले आहे व खास आकर्षक बक्षीसासह मानाच्या पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी महिलांना उपलब्ध करून देण्यात आली आहे 

या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व निवेदन प्रसिद्ध सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर व बाल गायिका टीव्ही स्टार सह्याद्री मळेगावकर हे करणार आहेत 

खेळ रंगला पैठणीचा या होम मिनिस्टरास प्रथम बक्षीस वाशिंग मशीन व मानाची पैठणी , दुसरे बक्षीस फ्रीज , तिसरे बक्षीस टीव्ही , चौथे बक्षीस पिठाची गिरणी , पाचवे बक्षीस कुलर , सहावे बक्षीस गॅस शेगडी , सातवे बक्षीस मिक्सर , आठवे बक्षीस ओव्हन , नववे बक्षीस इलेक्ट्रॉनिक शेगडी , दहावे बक्षीस कुकर , अकरावे बक्षीस डिनर सेट यासह उपस्थित महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत यापूर्वीही अशोक भाऊ जगदाळे यांनी महिलांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन सहली , सामुदायिक विवाह सोहळे , बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे , शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे व मोफत बी बियाणे वाटप , दुष्काळग्रस्त गावासाठी टँकरने पाणीपुरवठा , जनावरांसाठी चारा छावण्या , विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य , ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर यासारखे अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवले आहेत 

मंगरूळ येथील सोमवारी संपन्न होत असलेल्या खेळ रंगला पैठणीचा होम मिनिस्टर या कार्यक्रमास परिसरातील महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून बक्षीस जिंकावे असे आवाहन अशोक भाऊ जगदाळे यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा