*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
बिरसा मुंडा आदिवासी समाज सुधारक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पौष्टिक, विविध रोग , व्याधी, यावर कारगर उपाय असलेल्या आरोग्य व आहारदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या नैसर्गिक रित्या येणाऱ्या रानभाज्यांचा व त्यांच्या पाककृतींचा महोत्सव ,प्रदर्शन तालुका कृषी अधिकारी कार्यालय माळशिरस येथे संपन्न झाला .रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी माननीय श्री सुरेश शेजुळ यांचे उपस्थित वसंतराव नाईक सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार श्री जगनाथ मगर यांच्या हस्ते झाले .सदर महोत्सवात विविध प्रकारच्या २४ रान भाज्यांचे नमुने व पाककृती अधिनस्त कृषी सहाय्यक व तालुक्यातील कृषी शेतकरी बांधव यांनी सादर केल्या . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुरेश शेजुळ तहसीलदार माळशिरस यांनी आपले मार्गदर्शनात रानभाज्यांची व्यापक प्रचार, प्रसार व प्रसिद्धी करणेबाबत आव्हान केले . श्री जगन्नाथ मगर यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्त्व विशद करून याची लागवड परस बागेत करण्याबाबत आव्हान केले . कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री सतीश कोळेकर यांनी केले . सदर महोत्सवासाठी सौ सारिका एकपुरे , सौ स्वप्ना गोफने व सौ विदया माळी यांनी स्वादिष्ट रुचकर रानभाज्याची पाककृती व पक्वान्नाचे सादरीकरण केले व उपस्थितीत उपस्थित त्यांना चवीसाठी उपलब्ध करून दिले . सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन आयोजन श्री सतीश कचरे मंडल कृषी अधिकारी, नातेपुते श्री कुलदीप ढेकळे तालुका तंत्र व्यवस्थापक, आत्मा व सौ रेश्मा क्षीरसागर सहाय्यक तंत्र व्यवस्थापक, आत्मा माळशिरस यांनी केले व यासाठी परिश्रम घेतले तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सवासाठी तालुका अधिनिस्त कृषी सहाय्यक , कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, पुरस्कार प्राप्त शेतकरी व शेतकरी बांधव यांनी उपस्थिती दर्शवली .





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा