Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

*सणासुदीच्या काळात शासनाचा महागाईचा दणका?--- सर्वसामान्याच्या खिशाला झळ ....खाद्यतेल 12 टक्क्यांनी महाग*


 

*उपसंपादक --नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

गणेशोत्सव संपल्यानंतर आता देशाला वेध लागलेत नवरात्र, दसरा व दिवाळीचे. या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य माणसांच्या उत्साहाला उधाण येते. याच काळात अनेक कंपन्यांचे बोनस होतात. त्यामुळे बाजारात खरेदीला जोर येतो. आता सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच देशात गेल्या ४ दिवसांत महागाईने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तेलाचे दर १२ टक्क्याने वाढले आहेत. विशेष म्हणजे, खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.


सणासुदीला घरात गोडधोड व फराळ बनवावा लागतो. त्यामुळे खाद्यपदार्थांवरील खर्च वाढणार आहे. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोपडा यांनी बुधवारी दावा केला होता की, सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होणार नाही. कारण जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळू शकतो.


पण, केंद्रीय ग्राहक व्यवहार खात्याने देशातील जीवनावश्यक वस्तूंची वाढलेली आकडेवारी जाहीर केली आहे. शेंगदाण्याचे तेल चार दिवसांत १८० वरून १८६ रुपये प्रति लिटर, मोहरीचे तेल १४२ वरून १४८ रुपये प्रति लिटर, वनस्पती तेल १२२ वरून १२६ रुपये प्रति लिटर झाले आहे. हे सर्व दर सरकारी असून किरकोळ बाजारात यापेक्षाही अधिक किमती असू शकतात.

ग्राहक खात्याच्या माहितीनुसार, खाद्यतेलांच्या दरात ८ टक्क्याने वाढ झाली. १५ सप्टेंबर रोजी सोयाबीन तेल ११८ रुपये लिटर होते, ते १९ सप्टेंबर रोजी १२६ रुपये लिटर झाले. याच काळात पामतेल १०० रुपयांवरून १०७ रुपये लिटर, तर सूर्यफुलाचे तेल ११९ वरून १२६ रुपये प्रति लिटर झाले आहेत.


दरवाढीवरून खाद्यतेल कंपन्यांची झाडाझडती


खाद्यतेलाचे दर वाढल्याने केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. केंद्राने खाद्यतेल कंपन्यांकडून दरवाढीबाबत खुलासा मागवला आहे. खाद्यतेलाचे दर स्थिर ठेवण्याचा सल्ला केंद्राने या कंपन्यांना दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा