*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*पञकार---सांगली*
*मो ;-8983 587 160
सांगली - मिरज सह संपूर्ण महाराष्ट्रात
ईद - ए - मिलाद मोठ्या उत्साहात, धुमधडाक्यात,आणि शांतीपूर्ण साजरा झाला.
आज जातीयवादी अतिरेकी मानवतेची विषवल्ली , द्वेष पसरवत असताना भारतातील मुस्लिम हें हिंदू समुदायाशी एकनिष्ठ राहत "हिंदू - मुस्लिम " एकोपा टिकवून आहेत. मतांचे "ध्रुवीकरण" करण्यासाठी जातीपातीचे राजकारण करण्यात येते परंतु हिंदू - मुस्लिम हें एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना कोणीच "वेगळे" करू शकणार नाही हें पुन्हा एकदा प्रकर्षाने "सिद्ध" होत आहे .
आज शिवजयंती किंवा गणपती विसर्जन मिरवणुकीत मस्जिद किंवा "दर्गाह मिरवणुकीदरम्यान समोर आल्यावर स्पीकरचा आवाज थांबवला जातो किंवा सामाजिक एकोपा असणारी कव्वाली लावली जाते.
काल - परवा झालेल्या ईद ए मिलाद च्या मिरवणुकीमध्ये मुस्लिम बांधवांनी भारतातील आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ मुस्लिमांनी महाराजांच्या वर पुष्पवृष्टी करत हिंदू -मुस्लिम भाई भाई चा नारा दिला. हाच आपला सर्वधर्मसमभाव आणि "सांस्कृतिक मिलाफ" आहे.
सांगलीत देखील समस्त मुस्लिम समाज आणि विविध ग्रुपतर्फे ईद ए मिलाद निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रेषित मोहम्मद पैगंबरांचे आचार - विचारांचे बॅनर नळभाग येथे लावण्यात आले होते.
भव्य स्वरूपात निघालेल्या जुलूसमध्ये रिक्षा तसेच अन्य वाहनांवर बहुसंख्य सर्वधर्मीय समाजाला प्रेषितांच्या आदर्श विचारांची व्हावी या उद्देशाने प्रेषितांची माहिती देणारे "बॅनर" लक्ष्यवेधी दिसतं होते.
नळभागात अलबतीन बारसकर , अरसलान बारसकर, हंजल बावा, अश्फाक जमादार, अख्तर खान ,जावेद कच्छी, नईम पटवेगार व अन्य कार्यकर्त्यांच्या बळावर सुमारे 3000 लोकांसाठी बिर्याणी चा महाप्रसाद करण्यात आला व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. बहुजन नेते असिफ बावा सांगलीचे खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील,जयश्री पाटील, पृथ्वीराज पवार, जब्बार बारसकर तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते -पदाधिकारी यांनी ईद ए मिलाद निमित्त जुलूस ला भेट देऊन आनंद साजरा केला. भविष्यात सर्वधर्मीय समाजाची ही व्रजमूठ अशीच तेवत असणार यात तिळमात्र शंका नाही.
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा