*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो;--9730 867 448*
तहसीलदार, तहसिल कार्यालय तुळजापूर. मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धाराशिव जिल्हा शिवासेना उपप्रमुख शाम पवार यांनी
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर मध्ये झालेल्या नौकर भरतीमध्ये पारदर्शकता व रोस्टर पद्धतीने झालेली नसल्याने सदर प्रकरणाची चौकशी होवुन यात गुंतलेल्यांवर कायदेशीर कारवाई करुन भरती प्रक्रिया नव्याने राबविणे बाबत निवेदन सादर करण्यात आले असून त्याबाबत सविस्तर माहिती अशी की
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथे नुकतीच 62 विविध पदासाठी नोकर भरती झालेली आहे .सदरच्या नोकर भरतीचे प्रमाणपत्र देतेवेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांनी ही भरती गुणवत्ता व पारदर्शक या निकषावर झाली आहे असे उपस्थित पत्रकारांना सांगितले. परंतु वस्तूस्थिती आशी आहे की, या नोकर भरतीत पारदर्शकता नव्हती. कारण या नोकर भरतीसाठी रोस्टर पद्धत अवलंबण्यात आली नाही. त्याचप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची निवड ही स्थानिक अथवा तालुक्यातील भुमीपुत्रांची होणे गरजेचे होते. तसे न होता यासाठी राज्य पातळीवरून ही निवड झालेली आहे. यामुळे भूमिपत्रावर अन्याय झालेला आहे.
तसेच या भरतीत सत्तर ते तीस टक्के याचा वापर केलेला नाही. यामुळे या भरतीत स्थानिक, तालुकावाशी व जिल्हा वाशियावर मोठा अन्याय झालेला आहे. नौकर भरती 48 पदाकरिता जाहिरात दिली होती. परंतु प्रत्यक्षात ती 62 पदे भरलेली आहेत .उर्वरित 14 पदावर गैर व्यवहार झाला आहे का? याचीही सखोल चौकशी करावी. व यात गुंतलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करुन सदरच्या नोकर भरतीवर स्थगिती आणून नव्याने भरती करण्यात यावी. अन्यथा तुळजापूर शहर व तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे च्या वतीने भुमिपुत्रांना सोबत घेवुन तीव्र आंदोलन करण्यात येईलव त्याची सर्वस्वी जबाबादारी प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी ही विनंती
आपला नम्र,
*शाम अंबादास पवार* माहीतीस्तव:-
1. मा. ना. श्री. तानाजीराव सावंत, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, धाराशिव.
2. मा. विभागीय आयुक्त साहेब, विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा