*ज्येष्ठ--पञकार,संजय लोहकरे*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
मराठा समाजाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावल्या,समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला येथील महर्षी चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
गेल्या आठवड्यात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बेताल व समाजात फूट पडेल असे वक्तव्य केले होते.त्यांच्या वक्तव्याने संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असल्याने त्यांचा निषेध करण्यात आला.
पोलिसांना दिलेल्या निवेदना प्रमाणे सकाळी ११ वाजता समाजाचे कार्यकर्ते येथील महर्षी चौकात जमले व आ.राऊत यांच्या निषेधाच्या तसेच एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर त्यांची प्रतिमा पायदळी तुडवण्यात आली.प्रतिमेला काठीने व जोड्याने मारण्यात आले.शेवटी आ.राऊत यांनी मराठा समाजात फूट पाडणारे व समाजाचे नेतृत्वाविरोधात वक्तव्य केल्याने त्यांचे विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थीत होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा