Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

*देवाचं देवपण कधी* *कळालचं नाही*


 

प्रेरणा विकास गायकवाड

७ सप्टेंबर रोजी विघ्नहर्ता, सुखकर्ता,दुखहर्ता,शिवपार्वती पुत्र,गणपती बाप्पा यांच आगमन झालं....सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरल...दहा दिवसांसाठी सगळी कामं बाजूला ठेवून अनेक लोक आपल्या गावी परतले...कुटुंबासोबतचा आनंद,बाप्पाचं आगमन या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी सगळे एकत्र आले...दिवस कसे संपत गेले हे उमंगलच नाही...!! पाहता पाहता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली...स्वतःची काम बाजूला ठेवून बाप्पासाठी गावी आलेले लोक ही बाप्पाला घालवून परतीच्या वाटेला निघतील...!! परंतु ...स्वतःच्या मुलांसोबत थोडे दिवस का होईना एकत्र राहायला मिळतंय या विचाराने गावी राहणाऱ्या आईबापाने मात्र दहा दिवसांमध्ये वर्षभराचे अनुभव,आनंद जगून घेतला...!! कारण त्यांना माहिती होतं आता का आपली मुलं गेली की नंतर येते ते फक्त त्यांचे पाकीट...!! आणि पुढच्या वर्षी लवकर या!! असं सांगून बाप्पाला निरोप दिला..!! खरं तर दुःख गणपती बाप्पा जाण्याचं नव्हतं, दुःख होतं की आमची मुलं गावी बाप्पा सोबतच येतात आणि बाप्पा सोबतच जातात...!!!! आणि दुर्दैव म्हणजे दारामध्ये उभं राहून पुढच्या वर्षी लवकर या असं सांगणारे आई-बाप मुलांना कधीच दिसत नाहीत....!!! खरं तर असं म्हणतात देव सर्वत्र असतो.फक्त तो शोधता आला पाहिजे....

        सध्याच्या काळामध्ये मुलं गावी येणं हे एक कर्तव्य समजून बसलेत,गावी येणं कुटुंबासोबत राहणं,तिथल्या वातावरणामध्ये रमून जाण या गोष्टी कधी शहरात राहून अनुभवता येत नाहीत... सणासुदीपुरतं गावी येणं सन समारंभ उरकन आणि परत पैशासाठी आयुष्यभर धावणं हा आनंदी कधीच होऊ शकत नाही...! 

 मग कधी कधी प्रश्न पडतो की गणपती बाप्पा वर्षभर राहिले असते तर आम्ही गावी आलो असतो का...??? सध्याची पिढी पैसा कमावण्याच्या एवढी मागे लागली की त्यांना सण देखील आता एक कर्तव्य वाटू लागले एक जबाबदारी वाटू लागली...!! आणि त्यामुळेच त्या सणांचा आनंद कमी होत चाललाय...!

त्यामुळे सण समारंभ हे विभक्त कुटुंबांना एकत्र आणणारी दुवा ठरतात...!! परंतु आज आपण या समारंभाला देखील पुरता वेळ देऊ शकत नाही...!! दहा दिवसाचा गणपती आता पाच दिवसांमध्येच विसर्जन होतो पाच दिवसाचा गणपती दीड दिवसांमध्येच विसर्जन होतं आणि या सगळ्याचं कारण आम्हाला वेळ नसतो...!! काम दररोज होत राहतील परंतु सण समारंभ हे वर्षातून एकदाच होतात त्यामुळे त्याचा आनंद लुटा...!! आणि आपल्या कुटुंबाला आणि गावाला वेळ द्या...!!! 


*गणपती बाप्पा मोरया...!!*


*प्रेरणा विकास गायकवाड*

 शंकराव मोहिते महाविद्यालय      

            अकलूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा