*गणेशगाव---प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
माळशिरस तालुक्यातील पुर्व भागातील तांबवे येथील रहिवासी व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन ,मा.सरपंच विकास तानाजी कोळेकर यांचे दिनांक २३ सप्टेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.मृत्युसमयी ते ४५ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात आई,पत्नी पंचयात समिती सदस्या लतिका विकास कोळेकर,भाऊ,वहिनी तीन बहिणी,एक मुलगा एक मुलगी व एक पुतण्या एक पुतणी असा परिवार आहे.गावात त्यांनी अनेक विकासाची कामे केली आहेत ते जेवण करीत असताना हृदय विकाराचा झटका आला व त्यांचे निधन झाले.कर्तव्यदक्ष राजकारणी म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होते .त्यांच्या अचानक जाण्याने तांबवे, गणेशगाव,लवंगचे गावकरी हळ हळ व्यक्त करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा