इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147
- --- मानवजातीला शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी बावडा (ता. इंदापूर) पंचक्रोशीतील मुस्लिम धर्मिय नागरिकांच्या सहभागाने शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शरबत, मिठाई व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार (ता. २१) गावातील मक्का मस्जिद ते भांडगाव चौक, डॉ. आंबेडकर चौक, राजश्री शाहू महाराज चौक, ग्रामपंचायत, बाजारतळ मार्गावरून जुलूस (मिरवणूक) शांततेत काढण्यात आला. जुलूस चे ठिक ठिकाणी सर्व धर्मियांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यानिमित्त मस्जिदवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी गावातून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या मक्का मदिनाची प्रतिकृतीला आकर्षक विद्युत रोषणाई करून जुलूस (मिरवणुक ) काढण्यात आली होती. यामध्ये घोडे, उंटही सजवून सामिल करण्यात आले होते. तसेच पंचक्रोशीतील गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्यानंतर मक्का मशिदीमध्ये मुस्लिम धर्मातील विचार आचारावर आधारित बयान व नातेपाकचे सादरीकरण केले. मक्का मशिदीत जगात शांततेसाठी प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी घालून दिलेल्या विचाराचे आचरण दैनंदिन जीवनात अनुकरण करावे, असे आपल्या बयानमध्ये (प्रवचनात) विविध वक्त्यांनी सांगितले. त्यानंतर सर्वत्र सर्वधर्म समभाव वाढीस लागावा व शांतता नांदावी म्हणून विशेष सामुहिक प्रार्थना (दुआ) केली.
कार्यक्रमास गावातील हिंदू मुस्लिम बांधवांसह इतर राज्यातील डाळिंबाचे व टोमॅटो व्यापारी, लहान मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त महाप्रसाद (लंगर खाना) देण्यात आला होता. तसेच चाॅकलेट, जिलेबी चे वाटपही करण्यात आले. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व मुस्लिम जमात बांधवांनी प्रयत्न केले. बावडा गावातून सर्व धर्मिय बांधवांच्या स्वागताने व पोलीस संरक्षणात जुलूस (मिरवणूक) शांततेत अल्लाहचे नामस्मरण करत काढण्यात आला.
फोटो - बावडा येथे हजरत मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरी.
---------------------------






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा