Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

*तंत्रज्ञानाच्या युगात भाषेच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी-- डॉ. तायाजी लोंढे*


 

*अकलुज ------प्रतिनिधी*

  *केदार  लोहकरे*

    *टाइम्स 46 न्युज मराठी*

अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस समारंभाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील बावडा, महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.तायाजी लोंढे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ.शिवप्रसाद टिळेकर होते. 

         या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. प्रमुख पाहुणे लोंढे यांनी आपल्या मनोगतातुन हिंदी भाषेच्या सहाय्याने अनुवाद,जाहिरात, संचार माध्यमं,इलेक्ट्रॉनिक मिडिया,पर्यटन,सोशल मिडिया, इंटरनेट इत्यादी क्षेत्रात रोजगार मिळू शकतात.भाषेवर प्रभुत्व मिळविल्यास चित्रपट क्षेत्रात पटकथा लेखन,डबींग इत्यादी मधून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी या क्षेत्रात सक्रिय आहेत. तसेच हिंदी भाषा ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे असा आवर्जुन उल्लेख केला.यावेळी प्राचार्य प्रो.डाॅ.शिवप्रसाद टिळेकर यांनी आपल्या मनोगतात हिंदी येणाऱ्या काळात अंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळखली जाईल असी आशा व्यक्त केली.हिंदी आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अतिशय महत्त्वाची भाषा बनत आहे‌. 

           हिंदी दिवसाचे औचित्य साधून हिंदी विभागाच्या वतीने महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला.या सप्ताहात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण प्रमुख पाहुण्याच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये काव्य वाचन प्रतियोगिता,निबंध लेखन प्रतियोगिता व सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा प्रतियोगिता या तीन्ही स्पर्धांमध्ये जवळपास १५० विद्यार्थीं सहभाग झाले. 

या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे- १) काव्य वाचन स्पर्धा- प्रथम क्रमांक-गौरी लोंढे,व्दितीय क्रमांक-सना शेख,तृतीय क्रमांक- गायत्री पाटील,उत्तेजनार्थ - अकलेश गेजगे,प्रतीक्षा मस्के 

२) सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा- प्रथम क्रमांक (विभागून) राज शिंदे,श्रावणी ढगे,व्दितीय क्रमांक (विभागून)-मोहिने तुपे,आरती साठे,तृतीय क्रमांक जान्हवी माने 

३) निंबध लेखन-प्रथम क्रमांक- गौरी गौड,व्दितीय क्रमांक-गौरी लोंढे,तृतीय क्रमांक-हितेष पुंज उत्तेजनार्थ राजनंदिनी बोडरे, ज्योति भगत यांनी यश मिळवले. बक्षीस प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून एम्.ए.हिंदी विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवून या विषयातील प्रथम क्रमांकाचा सौ.सविता गायकवाड सन्मान प्राप्त करणाऱ्या हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी गिरीजा गायकवाड यांनी मार्च २०२३ च्या परीक्षेत यश संपादन केले.या विद्यार्थ्यांनीचा यथोचित सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.या सप्ताहात काव्य वाचन स्पर्धेचे परीक्षक-प्रा.विनायक सूर्यवंशी,डॉ.विजयकुमार शिंदे, निबंध लेखन स्पर्धेचे परीक्षक- डॉ.निवृत्ती लोखंडे,विजयकुमार शिंदे तसेच सामान्य ज्ञान प्रश्न मंजूषा स्पर्धेचे परीक्षक- डॉ.विजयकुमार शिंदे व प्रा. सोमनाथ चव्हाण यांनी काम पाहिले. 



          या कार्यक्रमांचे प्रस्ताविक राज शिंदे,प्रमुख पाहुण्याचा परिचय रोहिणी चव्हाण तसेच तमन्ना तिकोटे,ऋतुजा शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सूत्रसंचालनाची धुरा संभाळण्याचे काम गौरी लोंढे हिने अत्यंत प्रभावीपणे केले शेवटी सर्वांचे आभार साक्षी भाकरे या विद्यार्थींनीने व्यक्त केले.याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.दादासाहेब कोकाटे,डॉ.आण्णासाहेब नलवडे, प्रा.रणजीत लवटे उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हिंदी विभागातील सर्व विद्यार्थी,डॉ.विजयकुमार शिंदे व प्रा.सोमनाथ चव्हाण यांनी हिंदी विभाग प्रमुख डॉ.निवृत्ती लोखंडे यांच्या मार्गदर्शनानुसार परिश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा