*विशेष ----प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्युज मराठी*
*मो--9096 837 451*
लातूर----सोलापूर महामार्गावरुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लातूर सोलापूर महामार्गवरील वासनगाव पाटी येथे ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींना तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूर- सोलापूर महामार्गावरुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लातूर सोलापूर महामार्गवरील वासनगाव पाटी येथे ट्रॅव्हल्स पलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
लातूर पुणे अशी चालणारी साईराम ट्रॅव्हल्स पुण्यावरुन लातूरच्या दिशेने चालली होती. यावेळी बसमध्ये 20 प्रवासी प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास वासनगाव पाटी येथे ट्रॅव्हल्स पलटी झाली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर तर काही जण किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींना तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात हालवण्यात आले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा