Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

*स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी ओंकार राजे निंबाळकर तर जिल्हाप्रसिद्धीप्रमुख पदी गणेश जाधव (पत्रकार) यांची निवड*



 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सर्वं सहकाऱ्यांना सोबत घेऊन ज्याप्रमाणे स्वराज्य निर्माण केले.त्याप्रमाणे स्वाभिमानी मराठा महासंघ चे संस्थापक अध्यक्ष डॉ.कृषीराज टकले पाटील यांनी संघटना स्थापन केल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अनेक मराठा बांधव जोडले आहेत.

महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात ग्रामीण भागात सध्या अनेक पदाधिकारी आहेत.

नुकतीच माळशिरस तालुक्यातील येळीव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते ओमराजे निंबाळकर यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेचे अध्यक्ष यांनी त्यांची महाराष्ट्र राज्याच्या संपर्क पदी नियुक्ती केली आहे.

तर अकलूज येथील पत्रकार गणेश लक्ष्मण जाधव यांची सोलापूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती केल्याचे पत्र संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी दिले आहे.



निवडीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष मराठा राम नारायण,राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष एम के बीएन आर सागर, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिपक दादा पवार, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अभिजित खैरे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अनिता पाटील, कार्याध्यक्षा अमृता पठारे, युवा आघाडी प्रदेश कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, दक्षता आघाडी प्रदेशाध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे सरकार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सिताताई जाधव आदिंनी स्वागत केले आहे.

स्वाभिमानी मराठा महासंघ च्या माध्यमातून मराठा समाजातील शेतकरी,विद्यार्थी,तसेच तरुणांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडविले जातात.

या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.मराठा समाजाचे प्रश्न हाती घेऊन या संघटनेच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या संघटनेच्या वतीने मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक आंदोलन, उपोषण करण्यात आली आहेत. तसेच अनेक प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे.

सदर नियुक्ती झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर व गणेश जाधव यांनी सांगितले की, संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांच्या मार्गदर्शना खाली मराठा समाजातील सर्वं प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाजातील सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार असून, संघटना वाढविण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

दरम्यान या निवडी नंतर निंबाळकर व जाधव यांना संघटनेचे सर्वं पदाधिकारी, मित्रमंडळी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा