Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

*ॲड-वजीर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग प्रदेश "महासचिवपदी"निवड झाल्याबद्दल विजयसिंह मोहिते पाटील व खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार.*


 

विशेष ----प्रतिनिधी

  एहसान  मुलाणी

 टाइम्स 45 न्युज मराठी

   मो--9096 837 451

ॲड. वजीर रहिमतुल्ला शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभाग प्रदेश महासचिव पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला





राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  जयंतराव पाटील  यांच्या मान्यतेने आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभाग  महाराष्ट्र प्रदेश "महासचिव"पदी अकलुज येथील मुस्लिम समाजाचे नेते "ॲड-वजीर रहिमतुल्ला शेख "

यांची निवड  केल्याचे   नियुक्तीपत्र देण्यात आले

        याप्रसंगी खासदार फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष हबीब जावेद उपाध्यक्ष तेजसिंग अहलुवालिया आधी मान्यवर उपस्थित होते

     राष्ट्रीय अध्यक्ष शरद चन्द्र पवार  यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातुन सर्वसामान्य अल्पसंख्याकांच्या विकासात आपण भरीव कार्य करुन, पक्ष संघटना मजबुतीने उभी करण्यास प्रयत्न करणार असल्याचे नवनियुक्त "महासचिव"ॲड.वजीर  रहिमतुल्ला शेख यांनी सांगितले .



 त्यांच्या या निवडी बाबत सर्वच स्तरातून  अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे.


ॲड-वजीर रहिमतुल्ला शेख यांच्या निवडी बाबत"टाइम्स 45 न्युज मराठी"परिवाराच्या वतीने हर्दिक हर्दिक-अभिनंदन.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा