Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

बैल पोळा सणानिमित्त आठवडे बाजारात बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

 


इंदापूर तालुका...... प्रतिनिधी एस. बी. तांबोळी, मोबाईल-8378081147

--- - भाद्र्पद मासातील अमावास्येच्या दिवशी पुणे जिल्ह्यात शेतकरी राजा सर्जा - राजाचा बैलपोळा सण साजरा करतात. त्यानिमित्त परिसरातील आठवडे बाजारात सध्याला बैलांच्या सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. परंतु सध्याला पावसाच्या अभावामुळे खरेदीचा उत्साह कमी दिसत आहे. तर यात्रिकीकरणाच्या जमान्यात बैलांची संख्या कमी झाल्याने मातीचे बैल घेण्याकडेही कल वाढला आहे. 

    यावर्षी पावसाने सुरवातीपासून परिसरात दांडी मारल्याने शेतकरी राजा चारा व पाण्याच्या उपलब्धतेत वैतागला आहे. परंतु सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यात तुरळक पाऊस पडला. पण वर्षभराचे ॠणातून उत्तराई होण्यासाठी सण साजरा केला जातो. त्यासाठी सुताचे तयार माल वेसण, म्होरकी, पितळी साखळ्या, बेगड, पायांतील तोडे याप्रकारचा माल सध्याला तयार सहजरीत्या उपलब्ध होत आहे. पूर्वी मात्र अशा प्रकारचा माल मजुरांकडून हजेरीत तयार करून घ्यावा लागत होता. परिसरातील अकलूज, नरसिंहपूर, टेंभुर्णी, पिंपरी बुद्रुक, बावडा, रेडणी, इंदापूर आठवडे बाजारात अशा प्रकारच्या खरेदीसाठी दुष्काळातही गर्दी वाढताना दिसत आहे. 



    - जीएसटीमुळे ४० ते ५० टक्के दरवाढ -

बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंचे दर जीएसटीमुळे ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामध्ये बैलाच्या अंगावरील झूल १४०० ते ३२०० रुपये, बाशिंगे १८० ते २९०, घंगरमाळ ७०० ते ११००, चाळ १०० ते २००, दृष्टीच्या माळा ७० ते १००, शिंबा १६० ते १८०, कवड्यांच्या माळा ७० ते १८० रुपये, सुताची दोरी १५० ते ३०० काळा गोप २०० ते २५० रुपयांपर्यंत आहेत. सुताचे प्रमाण कमी होऊन तयार मालाला मागणी वाढली आहे. 



चौकट - मागील साडेतीन महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने नीरा व भिमा नद्यांच्या पट्ट्यातील गावात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुधन वाचवण्यासाठी शेतकरेंना चारा टंचाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. नद्या दुथडी भरून वाहत असताना पाण्याकडे नुसते बघत बसण्याची वेळ आली आहे. 

फोटो - बावडा ( ता इंदापूर ) येथील आठवडा बाजारात बैल पोळा सणासाठी साहित्य विक्रीची दुकाने थाटल्याचे दिसत आहे.

.....................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा