Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

*वाशी तालुक्यातील गायरान जमिनी वाटप करण्याची "जाणीव संघटनेच्या "वतीने मुख्यमंत्री -एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी*

 


*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448

वाशी तालुक्यातील शासकीय पडीक गायरान जमिनीवर दलित भटके आदिवासी भूमिहीन यांनी 1986 पासून गायरान जमिनी वहीती खाली आणून पिके काढून उदरनिर्वाह भागवत आहेत यामध्ये वाशी तालुक्यातील बावी दसमेगाव पारा पिंपळगाव लिंगी ब्रह्मगाव लाखनगाव गोजवाडा मांडवा घाटपिंपरी ईजोरा पिंपळगाव क गोलेगाव इत्यादी गावातील शासकीय गायरान जमिनी अतिक्रमित पती-पत्नीच्या नावे करून सातबारा द्यावा तरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 महाराष्ट्र जमीन महसूल नियम मधील जमीन महसूल मंडळ अधिकारी व मंडळ अधिकारी यांचे कर्तव्य व कामे नियम 1970 मधील नियम 16 व 17 प्रमाणे जमिनीचे तपासणी करण्याची आदेश द्यावेत तसेच अतिक्रमीत शेतकरी यांच्यावर कायदेशीर दंड करून गाव नमुना 1ई नोंद घेऊन जिन्नस्वार पिकाची आकडेवारी सातबारा मधील स्तंभ 11 मधील शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाचा राष्ट्रीय उत्पन्नात वाढवीत असल्याचे पिकाची नोंद करण्यात यावी व आपल्या आदेशाप्रमाणे गायरान जमिनी गावातील भूमिहीन दलित आदिवासी यांच्या नावे गायरान जमिनी नियम आकलन करून सातबारा देण्यात यावा अशी मागणी वाशी तहसीलचे नायब तहसीलदार संदेश भोसले यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब निवेदनाद्वारे जाणीव संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ लगाडे जाणीव संघटनेचे तालुका उपाध्यक्ष भिकाजी गरड यांच्यामार्फत देण्यात आले आहे तसेच या निवेदनावर शालन धावारे शांताबाई धावारे शाहू धावारे जमुना धावारे साखरबाई धावारे उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा