Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

बैलपोळा

 

बैलपोळा


कष्टाशिवाय मातीला

पाण्याशिवाय शेतीला

पूर्णत्व च येत नाही

बैलाशिवाय मशागतीला.


मुक्या जीवाचा हा सण 

पुरणपोळी खाऊ घालून

झूल बेगड घुंगरांनी सजवून 

फेडतो बळीराजा त्याचे ऋण.


अंग घासून साबणाने

न्हाऊ घालतो प्रेमाने

हलगी ढोल वाजवीत 

मिरवतो अभिमानाने .


जुम्पत नाही औताला

उपकाराची जाणीव अशी सदा ठेवतो बळीराजा सर्जा संग तोही सुखावतो बैलपोळ्याला  



नूरजहाँ शेख

गणेशगांव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा