Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, २ सप्टेंबर, २०२४

*मराठा सेवा संघ माढा तालुक्याच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त 'शिवश्री गंगाधर बनबरे सरांचा'- केडर कॅम्प- संपन्न*


 *टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडचे, जिजाऊ ब्रिगेड व सर्व कक्ष माढा तालुक्याच्या वतीने मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त पदाधिकारी व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे (केडर कॅम्प)   १ सप्टेंबर रोजी जगदाळे मंगल कार्यालय, माढा येथे संपन्न  झाले.     


   

     प्रारंभी   प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख प्रशिक्षक संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे , संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सह संघटक शिवश्री दिनेश जगदाळे, संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष  शिवश्री सचिन जगताप, उद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री दत्ताजी शिंदे, संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती निताताई खटके, शिवमती लताताई जगदाळे, शिवमती शारदा शिंदे, शिवमती सुवर्णा लोंढे,शिवमती प्रफुल्लता मोहिते, शिवश्री विजयकुमार परबत , मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष शिवश्री निलेश देशमुख,उपाध्यक्ष शिवश्री मेजर अरूण जगताप, शिवश्री अ‍ॅड. विजयकुमार आडकर,शिवश्री किरण चव्हाण, सचिन महिंगडे यांच्या हस्ते व जिजाऊ वंदनेने करण्यात आले. प्रशिक्षक शिवश्री गंगाधर बनबरे यांनी मराठा सेवा संघाच्या स्थापनेमागील संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर यांची भुमिका,संघटनेची गरज व संघटनेचे महत्त्व, सेवा संघाचे कार्य व उद्दिष्टे,केडरची आवश्यकता,महिला म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ प्रेरणास्थान असलेला जगातील पहिला धर्म म्हणजे शिवधर्म,शिवधर्माची कार्यपद्धती, मराठा सेवा संघाची विचारधारा,पदाधिकारी व कार्यकर्ता कसा असावा, केडर कार्यकर्त्याने कसे दिसावे, बोलावे, वागावे, समाजात आपले विचार कसे पेरावेत, आपले खरे वैचारिक शत्रू कोण, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड ची भुमिका व कार्ये याविषयीची प्रशिक्षणातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी  मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच सर्व ३२ कक्षाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित होते. हे प्रशिक्षण शिबीर अतिशय उत्सहात  व शिस्तीत पार पडले. प्रशिक्षण शिबीराच्या समारोपाच्या सत्रात मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व ३२ कक्षात चांगले काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार प्रशिक्षण गंगाधर बनबरे, मराठा सेवा संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवश्री उत्तमराव माने, विभागीय कार्याध्यक्ष रविंद्र पवार, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शिवश्री किरण घाडगे, जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल यांच्या हस्ते करण्यात आला.  प्रशिक्षण शिबीराचे सुत्रसंचालन  मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष शिवश्री निलेश देशमुख यांनी केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे मेजर अरूण जगताप, सचिन महिंगडे,शंकर नागणे, शिवानंद बारबोले, तुकाराम भोसले,अजिंक्य चव्हाण यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण शिबिरास मराठा सेवा संघाचे अशोक लोंढे, संभाजी ब्रिगेडचे सुहास टोणपे,बालाजी जगताप,प्रा.डॉ. संजय चौधरी सर, प्रा.डॉ.महादेव थोरात सर, मराठा सेवा संघाचे करमाळा तालुकाध्यक्ष शिवश्री सचिन काळे,  संभाजी ब्रिगेडचे माळशिरस तालुकाध्यक्ष शिवश्री दिगंबर मिसाळ, उपाध्यक्ष सचिन पराडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष दत्ताजी ताड, माढा तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब वागज, जयसिंग जगताप, टेंभुर्णी शहराध्यक्ष सचिन खुळे, ,शंकर उबाळे, मराठा सेवा संघाचे शेखर सुर्वे,मनोज पवार, दत्तात्रय गरदडे, आनंद उंडे विजय काळे, प्रशांत जगताप, अर्जुन कदम  यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा