*अकलुज ---प्रतिनिधी*
*शकुर तांबोळी*
*टाइम्स 45 न्युज मराठी
अकलूज येथे दि. १३ व १४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सदाशिवराव माने विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले असून स्पर्धेत या विद्यालयाच्या आठ खेळाडूंनी प्रथम क्रमांक दोन खेळाडूंनी द्वितीय तर एका खेळाडूने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी विद्यालयातील १२ खेळाडूंची निवड झाली. या घवघवीत यशाबद्दल शि. प्र. मंडळ, अकलूज चे मार्गदर्शक संचालक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील, प्रशाला समितीचे सदस्य, मुख्याध्यापक .अमोल फुले सर यांनी यशस्वी खेळाडूंना व त्यांचे मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांना भरघोस यशाच्या व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा