*सांगली----पञकार*
*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*
*मो;-8983 587 160
मराठा - बहुजन बांधवांच्या "भावना" भडकावून राजकारण करणारे, मुस्लिमांना "खलनायक" बनवून "राजकीय अस्थिरता"निर्माण करणारे, "हिंदू -मुस्लिम "वाद पेटवत भाजपा साठी "अनुकूल" वातावरण करणारे, मस्जिद - दर्गाह वाद उकरून सर्व मराठा आणि बहुजन समाजात प्रश्नार्थक धार्मिक उन्माद" निर्माण करणारे, परीक्षेच्या काळात जाणीवपूर्वक मोहीम आखून बहुजन मुलांचे शैक्षणिक नुकसान करणारे, आणि समस्त भारताचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे नावं घेऊन जातीयवाद पसरवणारे, सत्तेची "पोळी" खाणारे, बेगडी प्रेम दाखवणारे (*फसवे*) नेते, कार्यकर्ते ,स्वतःला तथाकथित राजे समजणारे, स्वतःला गुरुजी समजणारे, आणि "धार्मिक असहिष्णुतेची" "बीजे" रोवणारे, जातीयवादी कुठल्या बिळात लपले आहेत ???
किरकोळ विषयात मोर्चा - आंदोलन करणारे, माझ्या महाराजांचा पुतळा पडला असताना साधा निषेधही करायला तयार नाहीत?? हेच का तुमचे "प्रेम" ???
शिवाजी महाराजांचा वापर तुम्हाला तुमच्या राजकारणासाठीच करायचा आहे का ??? माझ्या राजांच्या नावाचा वापर करून तुमचा "स्वार्थ" साधायचा आहे का ??
"छत्रपती शिवाजी महाराजांचा " पुतळा पडणे हें महाराष्ट्राचा अभिमान -स्वाभिमान दुखावणारे होते. गेले आठ दिवस झाले, एकाही जातीयवादी चेहऱ्याने पुतळा बनवणाऱ्या ' "आपटे"चा महाराष्ट्र सरकारचा महायुती सरकारचा, निषेध केला नाही. हेच का तुमचे शिवाजी महाराजांवरील "प्रेम" का ??? तुमचे खोटे प्रेम" आणि त्याचा मुखवटा आता गळून पडला आहे.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी कितीही वेळा माफी मागितली तरी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. "मुख्यमंत्र्यांच्या मुलगा" पुतळा बनविणारा आपटे हा मित्र असल्याची बातमी सोशल मीडियावर येत आहे. 2 फुटाच्या मूर्ती बनवण्याचा अनुभव असणाऱ्या "आपटे "या कारीगाराची शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्यासाठी नेमणूक कशी होते ??? करोडो रुपयाचे कामं त्या आपटेलाच का मिळते ?? त्यातील
कमिशन कुणाला मिळाले ??? शिवाय जर सांगलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा शेकडो वर्षांपूर्वीचा ब्रॉन्झचा "अश्वारुढ पुतळा" अजूनही सुरक्षित असेल तर 8 महिन्यात बांधलेला पुतळा केवळ पैसे खाण्यासाठी आणि फोटो मिरवण्यासाठीच बसवला होता का ???
तुमचे राजकारण होते,पण आमच्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या जनतेच्या "भावना" दुखावल्या जातात, हृदयावर व्रण आणि ओरखडे पडतात,आणि प्रचंड दुःख होते. परंतु जातीयवादी नेत्यांना त्याचे काय ???राजकारणासाठी कोणत्याही थरास जाणारे, "हिंदू -मुस्लिम " करणारे,राजकीय पोळी भाजणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळणारे पुढारी आणि "स्वयंभू नेते" यांचे "खरे स्थान" काय आहे हें जनतेने ओळखले आहे.
भारताच्या "विकासाचे" , महागाई कमी होण्याचे, बेरोजगारी कमी करण्याचे आणि रोजगार निर्मितीचे सकारात्मक मॉडेल जनतेला न देता केवळ धर्माची ही अफूची गोळी भोळ्याभाबड्या मराठा - बहुजन समाजाच्या तरुण पोरांना देता, त्यांचे मतपरिवर्तन करता,जहाल भाषणे" करता???
सर्वधर्मसमभाव आणि जातीय सलोखायामध्ये "छेद" देऊ नका,भारताच्या अखंड विकासासाठी, माणुसकी आणि बंधुभाव जपण्यासाठी प्रयत्न करा. जातीयवादाने केवळ धार्मिक उन्माद वाढतो, "घर" चालत नाही, नोकरी मिळत नाही,उदरनिर्वाह चालत नाही.हे ही समस्त बांधवानी लक्षात ठेवावे. ना बंद ,ना मोर्चा ,ना आंदोलन,..??? बेगडी अर्थात खोटे प्रेम दाखवणाऱ्यानी आणि जातीयवाद पसरवणाऱ्यानी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून साधा *निषेध* तर करावा..! बेगडी प्रेम दाखवणारे कुठल्या बिळात लपले आहेत ???
*इकबाल बाबासाहेब मुल्ला*
( *पत्रकार* )
संपादक - सांगली वेध,
संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.
*मोबाईल - 8983587160*






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा