Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

*महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचार निंदनीय--- ज्योतीताई ठाकरे* *आई तुळजाभवानी राज्यातील स्ञी शक्तीला बळ दे!*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

तुळजापूर -  महाराष्ट्र राज्यात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार निंदनीय असून घटनाबाह्य सरकार याबाबत घेत असलेली भूमिका संशयास्पद आहे, ग्रामीण भागातील तरुणीसह महिलांना या अन्याय अत्याचार विरोधात लढण्यासाठी आई तुळजाभवानी माता बळ देओ यासाठी तुळजाई नगरीत जागर महाआरती करून साकडे घातल्याचे मत उपनेत्या ज्योतीताई  ठाकरे यांनी व्यक्त केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधात हातबल घटनाबाह्य राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आणि कणखर महिलांच्या सन्मानार्थ  तुळजपूरात स्त्री शक्ति संवाद यात्रा26 सप्टेंबर  रोजी  आयोजित  करण्यात आली होती हि रॕली  तुळजापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार भव्य मशाल रॅली काढण्यात आली.



याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी समन्वयक तथा उपनेत्या ज्योतीताई ठाकरे उपनेत्या छायाताई शिंदे संपर्क संघटक रोशनी ताई कोरे गायकवाड निरक्षक सांजनाताई मुणगेकर शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच धाराशिव जिल्हा महिला संघटक श्यामलताई श्याम पवार वडणे यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार पर्यंत भव्य मशाल रॅली काढण्यात आली.

     बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी महिला वरील अत्याचाराचे वाढते प्रमाण लक्षात घेता शक्ती कायदा लवकरात लवकर पारित व्हावा आणि त्या संदर्भातील जनजागृती समाजात व्हावी यासाठीच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर महाद्वार पर्यंत मशाल रॅली द्वारे" दार उघड बया दार उघड" मनात आदिमाया आदिशक्ती तुळजाभवानी मातेकडे साकडे घालण्यात आले

    यामध्ये तुळजापूर तालुक्यातील असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन त्या ठिकाणी महाआरती करण्यात आली व रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी तुळजापूर तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख श्रीमती ललिता ताई सावंत. तसेच महिला आघाडी तालुकाप्रमुख सुरेखाताई मुळे .शहर प्रमुख शोभाताई शिंदे. नगीना विजय सूर्यवंशी. अश्विनी धनाजी तुळशी .कौशल्या भैरव वडणे .सारिका बाळासाहेब वडणे. रंजना दिलीप मगर. साधना प्रदीप मगर. गोदावरी आप्पासाहेब राऊत. चैताली सचिन गंदुरे. लक्ष्मी गुलाब जाड बुके. संतोषी बालाजी डांगे. रोहिणी रामेश्वर पवार. रतन गणपत डांगे .कविता तुकाराम बचाटे. छाया माणिक खराडे. मनीषा बाबुराव कानडे .सुलभा रमेश नरोडे. पार्वती. जिजाबाई. साळवे सुरेखा नागनाथ शेंडगे. मंगल विवेकानंद स्वामी. सोनाली बालाजी पांचाळ .स्वामी विद्यादेवी चंद्रशेखर. शिवानी बचाटे. अनिता कोळगे. सुलभा रमेश नरोडे. मनीषा बापूराव कानडे. कमल रामा डोंगरे .सुमन दादाराव नरोडे. प्रभात जाधव .शालिनी जाधव. व असंख्य महिला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा