विशेष ----प्रतिनिधी
एहसान मुलाणी
टाइम्स 45 न्युज मराठी
मो--9096 837 451
मुस्लिम समाजाबाबत व प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी माढा लोखसभा चे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून त्याबाबतचा सविस्तर वृत्तांत असे की
मागील कांही दिवसापासून राज्यात मुस्लीम समाजाबाबत व प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करुन मुस्लीम बांधवाच्या धार्मिक भावना दुखावणारे व सामाजिक शांतता भंग करणारे वक्तव्य कांही मान्यवर व्यक्ती करीत असल्याचे दिसून येत आहे. हे अत्यंत चुकीचे व राज्यातील सामाजिक शांतता भंग करणारे आहे.
तरी मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्यांवर
कायदेशिर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून देऊन राज्यातील सामाजिक शांतता व जातीय सलोखा राखण्यासाठी आपण योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे
*माढा- लोकसभा सदस्य-*
*धैर्यशील मोहिते पाटील*
*यशवंतनगर-अकलुज*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा