*उपसंपादक --नूरजहाँ शेख*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
जीवनाचा उपासक - कर्मवीर लाेहाेकरे गुरूजी चरित्र ग्रंथाची श्री चक्रधर स्वामी राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली हाेती'.या पुरस्काराचे विसावा पॅलेस,शिवाजी नगर, नांदेड या ठिकाणी वितरण करण्यात आले.सदर चरित्र ग्रंथाचे लेखक इंद्रजीत पाटील यांना याप्रसंगी शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह,सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.प्रस्तुत साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक मा.श्री.देविदास फुलारी सर व प्रसिद्ध उद्याेजक मा.श्री.बालाजी इबितदार यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी निरीक्षक जिल्हा ग्रंथालय,हिंगाेली मा.श्री.मिलींद साेनकांबळे,प्रसिद्ध साहित्यिक, सुत्रसंचालक प्रा.स्वाती कानेगावकर,मा.प्रा.डाॅ.संजय जगताप,मुख्याध्यापक मा.देवा मुंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री.चक्रधर स्वामी सार्वजनिक वाचनालय, शेवाळा,ता.कळमनुरी,जि.हिंगाेलीचे अध्यक्ष मा. श्री.अनिल मनाेहर कपाटे - शेवाळकर यांनी केले व हे बहारदार साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष योगदान दिले.यावेळी लेखक इंद्रजीत पाटील यांनी मनाेगत व चक्रधर स्वामींच्या जीवनावर आधारित सुंदर कविता सादर केली.
लेखक इंद्रजीत पाटील यांच्या या चरित्र ग्रंथाला व अन्य साहित्य कृतींना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून अजूनही मिळत आहेत.त्याबद्दल मा.श्री.पंडितराव लाेहाेकरे,विलास लाेहाेकरे,जीवन लाेहाेकरे,संजय भड,राकेश गरड,चंद्रकांत पाटील,अमाेल देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा दिल्या.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा