Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४

*कवी "इंद्रजीत पाटील "यांच्या कवितेची प्रथम क्रमांकाने निवड*


 

*उपसंपादक --नूरजहाँ शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

प्रतिभा साहित्य संघ,अकाेट,जि.अकाेला या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्सव पीकपाण्याचा या राज्यस्तरीय कथा व कविता लेखन स्पर्धेत साहित्यिक इंद्रजीत पाटील यांच्या ' अशीच गावची पांद हाेती ' या निसर्ग कवितेला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ' प्रथम क्रमांक ' मिळाला आहे.तज्ञ ज्येष्ठ साहित्यिक परीक्षकांनी अगदी पारदर्शक परीक्षण करून २८७ साहित्यकृतीतून हा प्रथम क्रमांक कवी इंद्रजीत पाटील यांच्या कवितेला दिला आहे.संस्थेचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध साहित्यिक विठ्ठल कुलट सर,विशाल कुलट यांनी तशी अधिकृतरित्या घाेषणा केली असून दि.२३/०९/२०२४,वार - साेमवार राेजी अकाेट याठिकाणी संध्याकाळी सात वाजता कवी इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल,श्रीफळ व राेख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

      कवी इंद्रजीत पाटील यांच्या साहित्य कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत असून अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा