Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

*प्रताप क्रीडा मंडळाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*


 

*अकलुज ------प्रतिनिधी*

  *केदार  लोहकरे*

    *टाइम्स 45 न्युज मराठी*

प्रताप क्रिडा मंडळ हे गेली ४६ वर्ष सामाजिक बांधिलकी जपत अविरतपणे कार्य करणारी संस्था असून या क्रिडा मंडळाची स्थापना सन १९७६ झाली आहे ग्रामीण भागात कला,क्रिडा, सामाजिक,सांस्कृतिक,आरोग्य इत्यादी अनेक क्षेत्रात विविध उपक्रम व क्रिडा स्पर्धा राबविण्यात अग्रेसर आहे.या प्रताप क्रिडा मंडळामुळे आज अनेक मुलांना कला,क्रिडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यामुळे अनेकांचे भवितव्य घडलेले आहे असे उदगार मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी काढले.

         प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर-अकलूजची सन ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा स.म.शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेची सुरुवात सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व स्व.श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन जेष्ठ संचालक वसंत जाधव यांच्या शुभहस्ते व अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील,स.म साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले,उपाध्यक्ष पोपट भोसले-पाटील या मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाले.

          या सभेचे इतिवृत्ताचे वाचन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव सर यांनी केले.अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सभेत सहा विषयांचे वाचन करण्यात आले त्यास सर्व सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.

           अध्यक्षीय मनोगतामध्ये मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी मंडळाच्या वतीने स्व.श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांची जन्मशताब्दी,मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील आणि अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त वार्षिक स्पर्धा व उपक्रम राबविले जात असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.सहकार महर्षींनी स्थापन केलेल्या संस्था सांभाळणे ही फार मोठी जबाबदारी असून संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याने सर्व उपक्रम,स्पर्धा यशस्वीपणे पार पडत आहेत. सामाजिक बांधिलकीचा उद्देश समोर ठेवून गेल्या ४६ वर्षापासून मंडळ अविरतपणे कार्य करत आहे.सर्व सभासदांनी आपले मानसिक आरोग्य जपत शारीरिक आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

            या सभेस मंडळाचे सर्व पदाधिकारी,संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सभेचे सूत्रसंचालन राजकुमार पाटील यांनी केले. मंडळाचे संचालक बाळासाहेब सावंत यांनी आभार मानले.या सभेची सांगता 'सारे जहाँ से अच्छा' या देशभक्तीपर गीताने झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा