Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

रविवार, २९ सप्टेंबर, २०२४

*विधानसभा निवडणुकीतही जनता नानाभाऊ पटोले यांच्या मागे भक्कमपणे उभी राहील-- जावेद बागवान* *सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक सचिव*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

राजकीय क्षेत्रात सर्वच लोकप्रतिनिधींना विविध राजकीय टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र, जेव्हा भंडारा गोंदियाच्या राजकीय क्षेत्रात नाना पटोले यांच्यावर राजकीय टीकेचा भडीमार होतो, तेव्हा दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांनी संघटित होऊन स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून नानांना भरघोस मतांनी विजय मिळवून दिला. परंतु,आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्यावर राजकीय टीकास्त्र सोडले जात आहे.


त्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये टीकाकारां विरोधात राजकीय संतापाची भावना दिसून येत आहे. या स्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांच्या विश्वासाला तडा जात असताना दुप्पट वेगाने नाना पुन्हा विरोधक व टीकाकारांना सामोरे जाणार असल्याची चर्चा आहे.


भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणात नाना पटोले यांचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नानांनी सर्वसामान्य मतदारांसोबत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.


तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात डमी उमेदवार उभे केल्याने नानांवर विविध अपक्ष उमेदवारांसह भाजप नेत्यांनी टीका केली होती. पण वरील सर्व टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देत नानांनी सर्वसामान्य मतदारांशी थेट संपर्क साधून दोन्ही उमेदवारांचा विजय नोंदवला होता.


एकूणच नाना पटोले यांची सर्वसामान्य जनतेशी असलेली थेट ओळख यामुळेच वर उल्लेखिलेल्या सर्व राजकीय लढाया जिंकण्यात नानाभाऊ  यशस्वी होत आहेत. एवढेच नाही तर गेल्या काही वर्षात साकोली विधानसभा मतदारसंघातील काही आयाराम नेते दादागिरीच्या चमत्कारामुळे आमदार म्हणून राजकीय क्षेत्रात जन्माला आल्याचीही चर्चा आहे.


ओबीसी आणि बहुजन समाजाचे नेते म्हणून नाना पटोले यांचा प्रभाव गेल्या काही वर्षांत राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे.या प्रतिमेमुळे नानांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवल्याची चर्चा आहे.


ओबीसी  जनगणनेबाबत नानांनी अनेकदा सरकारविरोधात आक्रमकता दाखवली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी नानांच्या विरोधात राजकीय षडयंत्र रचून त्यांना टार्गेट केले जात असल्याची चर्चा आहे.


काँग्रेसवाल्यांना सतर्क राहावे लागेल

सर्वसामान्यांबद्दल असलेल्या आपुलकीमुळे नाना पटोले यांचा सर्वाधिक प्रभाव भंडारा आणि गोंदियामध्ये दिसून आला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातही त्यांचे वर्चस्व दिसून येत आहे.मात्र हे वर्चस्व कमी करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील विविध पक्षांचे नेते व पधाधिकारी सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा राजकीय डाव रात्रंदिवस रचत आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसजनांनी सतर्क राहणे गरजेचे आहे


बऱ्याच वर्षांनी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल


अनेक वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील नाशिकराव तिरपुडे नावाच्या दलित नेत्याला राज्याचे उपमुख्यमंत्री करण्यात आले.त्यानंतर जिल्ह्यातील एकाही आमदाराला राज्यप्रमुखपदाची संधी मिळाली नसल्याची माहिती आहे. मात्र गेल्या काही वर्षात राज्यातील विविध पक्षांमधील राजकीय पेचप्रसंगामुळे राज्यातील काँग्रेस पक्षांतर्गत नाना पटोले यांच्यावर अधिक विश्वास दाखविल्याची चर्चा आहे 


मात्र,नानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठे यश मिळाले. वरील यश आगामी विधानसभा निवडणुकीतही मिळाले तर अनेक वर्षांनंतर  भंडारा जिल्ह्यातून नानांच्या रूपाने राज्याच्या प्रमुख होण्याचा मान मिळू शकेल.......


Next CM Maharashtra 2024

भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र 

नानाभाऊ पटोले साहेब 


 जावेद बागवान 

अल्पसंख्यांक जिल्हा सचिव,सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी

9561409785

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा