Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४

*सरकार मुस्लिमांना न्याय देण्यास असमर्थ ठरल्याने दलित-- मुस्लिमांनी काढली "संविधान बचाव तिरंगा रॕली"*

 


*इक्बाल बाबासाहेब मुल्ला*

  *सांगली -----पञकार*

   *मो;--8983 587 160

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यासाठी "जीव" देण्यास भारतातीलच नव्हे तर जगातील "मुस्लिम" मागेपुढे पाहत नाही, कारण जगाला शांतीचा संदेश त्यांनी दिला. अशा पैगंबराविरुद्ध रामगिरी आणि राणे यांच्या "भाडखाऊ" भाषणाविरुद्ध

60 गुन्हे दाखल असताना देखील कोणतीही कारवाई पोलिसांनी, न्यायव्यवस्थेने आणि महायुती सरकार ने अर्थात (एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) यांनी केली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या रागाचा बांध फुटला आणि लाखो मुस्लिम - दलित बांधव संविधान बचावासाठी मुंबईत दाखल झाले. लोकसभेच्या "सुनामीनंतर" मुस्लिमांच्या रागाचा कडेलोट पुन्हा एकदा विधानसभेत दिसून आल्यास "आश्चर्य" वाटू नये.

"सरकार" न्याय देण्यास "असमर्थ" ठरल्याने मुस्लिमांनी संविधान बचाव तिरंगा रॅली काढण्याचा निश्चय केला.व त्याचे "सारथ्य" इम्तियाज जलील यांनी केले. या रॅलीनंतर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना "संविधान" चे पवित्र पुस्तक "भेट" देण्यात येणार आहे. 

मुंबईत आलेले मुस्लिमांचे वादळ आज अभूतपूर्व ठरत आहे.महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून - गावातून स्वखर्चाने प्रेषितांच्या विरुद्ध बोलणाऱ्या टीकाकाराविरुद्ध "उद्वेग" व्यक्त केला. यामध्ये 82588 कार 11767 बाईक (दुचाकी ) , 126 बस , आणि 19115 टाटा व्हॅन -रिक्षा आणि "तिरंगा - निळा - भगवा - हिरवा" झेंड्यांच्या साक्षीने समस्त मुस्लिम-बहुजन बांधवांनी मुंबईत धडक देऊन प्रेषितांचा आणि इस्लाम चा "अपमान" भविष्यात कधीही सहन करणार नाही, शांतताप्रिय मुस्लिमांच्या नादाला पुन्हा लागू नका, मुस्लिम देखील झुंझार आहे, डरपोक नाही हें दाखवून दिले. 

संविधानाला नख लावाल तर असेच "उत्तर" जातीयवाद्यांना मिळणार असा "घणाघात" मुंबईत लाखो मुस्लिमांनी व्यक्त केला. 

सत्ताधारी जर मानवतेला आणि "मानवतावादी" वैचारिक मानसिकतेला "सुरुंग" लावत मूठमाती देत असतील तर भविष्यात सर्वधर्मसमभाव ची धगधगती मशाल, मानवतेचा हात आणि संविधान बचावाची तुतारी फुंकण्यासाठी सर्वानी "एकत्र" यायलाच हवे.

 कोणत्याही संतांना"धर्मगुरू" आणि धार्मिक कार्य करणाऱ्या प्रेषितांना "अभद्र" आणि "आपत्तीजनक" बोलण्याचा अधिकार राणे आणि रामगिरी यांना कोण दिला??? भारताचे संविधान आणि "कायद्यापेक्षा" ते मोठे आहेत का ?? 60 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या रामगिरी यांच्यावर महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत कोणतीही कारवाई का केली नाही ?? मस्जिद मध्ये घुसून मारू असे म्हणणाऱ्या राणे यांना अटक करण्याची "हिम्मत" एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात का नाही ??? महायुती सरकारला मुस्लिमांनी "मते" दिली नाहीत का ?? धार्मिक खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तीमुळे "कारवाई" होत नसेल तर भविष्यात मुस्लिमांचे 1% मतदान* ही महायुतीला होणार नाही ही "काळ्या" दगडावरील "पांढरी" रेष आहे असे आजपासून समजावे.

सर्व राजकीय नेत्यांचे राजकीय पक्षांशी लांगेबांधे आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरुद्ध "अपशब्द" बोलणाऱ्या कोणत्याही मुस्लिम नेत्याने आवाज उठविला नाही, मोर्चा काढला नाही, आंदोलन केले नाही. परंतु MIM चे इम्तियाज जलील या "वाघाने" मुस्लिमाना कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाशिवाय संविधान बचाव तिरंगा रॅलीमध्ये "सामील" होण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून प्रेषितांच्या सन्मानार्थ लाखो मुस्मिलांचा "जनसागर" मुंबईत पोहोचला. भारतातील गोदी मीडिया जातीयवाद्यांचे "तळवे" चाटते असे दिसते. कारण लाखो मुस्लिम रस्त्यावर "संविधान बचावासाठी" आलेले असताना देखील वृत्तपत्रात - सोशल मीडियावर "ठळकपणे" प्रसिद्धी देण्यात आली नाही.

हिंदू - मुस्लिम एकता आणि "अखंडतेला" कोणी "खिंडार" पाडत असेल,आणि सर्वधर्मसमभाव च्या पवित्र नात्याला राणे - रामगिरी सारखी प्रवृत्ती राजकीय स्वार्थासाठी ठेच पोहवचत असेल तर या भारतातील मुस्लिम कदापि शांत राहणार नाहीत . संविधानाच्या विरुद्ध "कृती" होत असेल तर ते "रोखण्याचा अधिकार" लोकशाहीने सर्वांना दिलेला आहे. त्यामुळेच मुस्लिमांना ही तिरंगा रॅली काढली. ? असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रयत्न होणें गरजेचे आहे . 

 भारतामध्ये सर्व संत - महात्मा यांना आदराचे स्थान आहे .श्रीराम -श्रीकृष्ण यांचे चरित्र "आदर्शवत" आणि अभिमानास्पद आहे . मुस्लिम देखील यांचा सन्मान करतात. प्रेषित पैगंबरचं नव्हे तर भारतातील कोणत्याही साधू -संत -प्रेषित यांच्याविरुद्ध अपशब्द काढणार्याविरुद्ध "गुन्हा" दाखल झाला पाहिजे.

तात्पर्य भारतातील 1850 जातीपाती* मध्ये विखुरलेल्या धर्माबद्दल अपमानास्पद बोलणाऱ्या कोणत्याही "व्यक्तीबद्दल" देखील कडक "कारवाई" झाली पाहिजे. 

संतांच्या विरुद्ध आणि प्रेषितांच्या विरुद्ध "अभद्र टीका" करणाऱ्या विरुद्ध एखादा कायदा संमत व्हायला हवा.जेणेकरून कोणी भविष्यात "धाडस" करू शकणार नाही. "प्रेषित मोहम्मद पैगंबर आणि इस्लामच्या विरुद्ध टीका करणाऱ्या "प्रवृत्तीच्या" विरुद्ध मुंबईत उसळलेला मुस्लिमांच्या अलोट गर्दीचा महासागर भविष्यात अमूल्य ठेवा ठरणार आहे हें निश्चित !

धन्यवाद !


 *इकबाल बाबासाहेब मुल्ला*

( *पत्रकार* )

संपादक - सांगली वेध,

संपादक - वेध मीडिया न्यूज,सांगली.

*मोबाईल - 8983587160*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा