Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

*तुळजापूर येथील आठवडी बाजार बुधवार ऐवजी मंगळवारीच भरवावा "सार्वजनिक बाजार संघर्ष समितीची "मागणी*


 

*टाइम्स 45 न्युज मराठी*

 *मो;--9730 867 448*

, तुळजापूर येथील आठवडी बाजार हा अनेक वर्षापासून मंगळवारी भरत आहे तो बाजार मंगळवार ऐवजी बुधवारी घेण्याचा निर्णय तुळजापूर नगर परिषदेने घेतला असल्याने हा निर्णय योग्य नसून तुळजापूरचा बाजार मंगळवारीच घ्यावा अशी मागणी सार्वजनिक बाजार संघर्ष समिती व्यापारी व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे धाराशिव चे जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे की

         तुळजापूर नगर परिषद आदेशच्या नावाने शहरातील स्वार्थी लोक तुळजापूर शहराचा आठवडी बाजाराचा दिवस मंगळवार ऐवजी बुधवार असा बदलण्यात आलेला आहे. अशा स्वरुपाची पोस्ट व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मिडीयावर फिरत असल्याने सर्व बाजारातील व्यापारी, भाजी विक्रेते, किराणा विक्रेते तसेच सर्व प्रकारचे व्यापारी व शेतकरी संभ्रमात आहेत.

तसेच तुळजापूर शहरातील आठवडी बाजारात गोरगरीब सामान्य नागरीक तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे अर्थकरण जोडलेले आहे. तरी जिल्हाधिकारी साहेब यांना  विनंती की, जर तुळजापूर आठवडी बाजाराचा दिवस बदला तर तुळजापूर शहरात होणारे व्यवहारावर आर्थिक दुष्परिणाम  होणार आहेत व सदरील आठवडी बाजाराचा दिवस बदला तर आठवडी बाजार बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी  जिल्हाधिरी यांना सार्वजनिक आठवडी बाजार समितीची कळकळीची विनंती आठवडी बाजार मंगळवार हा दिवस बदलण्यात येवू नये अशी विनंती  निवेदनाद्वारे केली आहेत

       तरी आपण या अर्जावर योग्यतो निर्णय घेवुन सर्वांना न्याय द्यावा अशी मागणी सर्वच स्तरातुन जोर धरत आहे.



या निवेदना वर सह्या  Answer खालील नागरिक 

 

  निवेदन कर्ता


अमोल शिवाजीराव जाधव

तुळजापूर

नाताजी शहाजीराव नेवते--तुळजापूर

प्रताप जाधव  ----तुळजापूर

गोपाळ धोञे    ----तुळजापूर

तात्या क्षीरसागर---तुळजापूर

सागरकुमार इंगळे -तुळजापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा